Bank Account Holders : सर्व बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 4 लाखांचे नुकसान टाळण्यासाठी लगेच करा हे काम...

PMJJBY And PMSBY : सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. छोट्या रकमेचा प्रीमियम भरून तुम्ही यापैकी काही योजनांचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या अशा दोन योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).या दोन विमा योजनाद्वारे अतिशय कमी रकमेचा विमा हफ्ता भरून सर्वसामान्य नागरिकांना विम्याचा (Insurance) लाभ दिला जातो आहे.

PMJJBY And PMSBY
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा हफ्ता
  • या योजनांचा हफ्ता कापला जाण्यासाठी तुमच्या बॅंक खात्यात ठेवा पुरेशी रक्कम
  • अगदी छोट्याशा रकमेद्वारे मिळेल 4 लाख रुपयांचा लाभ

PMJJBY And PMSBY Premium : नवी दिल्ली : सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. छोट्या रकमेचा प्रीमियम भरून तुम्ही यापैकी काही योजनांचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या अशा दोन योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).या दोन विमा योजनाद्वारे अतिशय कमी रकमेचा विमा हफ्ता भरून सर्वसामान्य नागरिकांना विम्याचा (Insurance) लाभ दिला जातो आहे. हा हफ्ता वार्षिक स्वरुपातील असून तो वर्षातून एकदा तुमच्या बॅंक खात्यातून (Bank Account)आपोआप कापला जातो. अर्थात त्यासाठी आधी तुम्ही या दोन योजनांसाठी नोंदणी केलेली पाहिजे. यासाठी तुमच्या बॅंकेकडून तुम्हाला विचारणा होते. त्यावेळेस तुम्ही फक्त स्वीकृती द्यायची असते. (If you want to get benefit of Rs 4 lakh through PMJJBY And PMSBY with your bank account, do this immediately)

अधिक वाचा : Russian LNG plant : युक्रेन युद्धाचा परिणाम... भारताची रशियात घोडदौड, भारतीय कंपन्या रशियन गॅस कंपनीतील हिस्सा विकत घेण्याची शक्यता...

नूतनीकरणाची रक्कम ऑटो डेबिट केली जाईल

तुमच्या माहितीसाठी, तुम्ही प्रीमियम भरून या योजनांचा लाभ घेऊ शकता. दरवर्षी 31 मे पर्यंत त्यांचे नूतनीकरण केले जाते. त्यांच्या नूतनीकरणासाठी, तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे. ही नूतनीकरणाची रक्कम मागील वर्षांमध्ये नावनोंदणी केलेल्या लोकांच्या खात्यातून स्वयंचलितपणे डेबिट केली जाते.

अधिक वाचा : Privatization of Banks : सेंट्रल बँक ऑफ इंडियासह 2 बँकांचे खाजगीकरण होण्याची चिन्हे, पाहा काय आहे सरकारची संपूर्ण योजना

342 रुपयांमध्ये मिळते 4 लाखाचे कव्हर

तुम्हाला माहित आहे का की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने (PMJJBY) मध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक सामील होऊ शकतात. यासाठी 2 लाख रुपयांचा आयुर्विमा दरवर्षी फक्त 330 रुपयांचा हफ्ता भरून उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोक सामील होऊ शकतात. यामध्ये 12 रुपयांच्या अत्यल्प रकमेत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. 

अधिक वाचा : Credit Card Bill Date : रिझर्व्ह बॅंकेने दिला मोठा दिलासा, आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्वतः बदलू शकता क्रेडिट कार्ड बिलाची तारीख

दोन्ही प्लॅनचा एकूण प्रीमियम 342 रुपये 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत, अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व कव्हर केले जाते. अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास विमाधारकास 1 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत दोन्ही योजनांसाठी 342 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरावा लागेल.

तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास तुम्हाला विमा संरक्षण मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला 4 लाख रुपयांच्या विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळेच तुमच्या बॅंक खात्यात पुरेशी रक्कम ठेवा आणि या दोन्ही योजनांचा लाभ घ्या.

आयुर्विमा हा आर्थिक नियोजनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मात्र बरेचवेळा लोक आपल्या कुटुंबाच्या खऱ्या आवश्यकतेचा किंवा गरजेचा अंदाज न घेता आयुर्विमा पॉलिसी (Life Insurance) घेतात. यामुळे तुमचे आर्थिक नियोजन (Financial Planning)परिपूर्ण न होता त्यात एक महत्त्वाचा घटक कमकुवत ठरू शकतो. आयुर्विम्याचा मुख्य हेतू विमाधारकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा, आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करणे हा असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी