Gold Investment option : नवी दिल्ली : सोने हा नेहमीच सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो. त्यातच मागील काही वर्षात सोन्याच्या भावात (Gold Price)जबरदस्त वाढ झाली आहे. एरवी प्रत्येक घरात सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याची परंपरा असते. कोणत्या ना कोणत्या रुपाने आपण सोने विकत घेतच असतो. मात्र प्रत्यक्ष सोने किंवा सोन्याचे दागिने घेण्याबरोबर सोन्यात गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय आहे. तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंडांचा (Gold Mutual Funds). हे म्युच्युअल फंडांचाच (Mutual Funds)एक प्रकार असतात जे सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष सोने बाळगण्याची गरज पडत नाही, मात्र सोन्यातील गुंतवणुकीचा फायदादेखील मिळतो. (If you want to invest in gold, Gold mutual funds is better option, check best schemes)
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक पाहत असाल तर गोल्ड म्युच्युअल फंड योजना तुमच्या पोर्टफोलिओसाठी योग्य असू शकतात. गेल्या वर्षभरात सोन्याने 10.34 टक्के परतावा दिला आहे. 19 एप्रिल 2021 रोजी सोन्याचा दर 1774.50 प्रति औंस होता आणि 14 एप्रिल 2022 रोजी ट्रेडिंग किंमत 1963.25 होती, त्यामुळे 10.34% परतावा मिळत होता.
अधिक वाचा : Interest rate | आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ, पाहा नवीन दर
गोल्ड म्युच्युअल फंड हे कमोडिटी म्युच्युअल फंड आहेत जे सोन्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करतात. गुंतवणूकदार एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ETFs) द्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकतात त्याचबरोबर सोन्याचे खाणकाम करणाऱ्या कंपन्या, संबंधित कंपन्यांचे स्टॉक खरेदी करू शकतात, शिवाय प्रत्यक्षातदेखील सोने खरेदी करू शकतात. राजकीय अस्थिरतेच्या काळात किंवा शेअर बाजार घसरत असताना गोल्ड म्युच्युअल फंडांचे महत्त्व वाढते.
तुमच्या माहितीसाठी इथे आम्ही काही चांगली कामगिरी करणाऱ्या गोल्ड म्युच्युअल फंड योजनांची यादी दिली आहे
आदित्य बिर्ला एसएल गोल्ड डायरेक्ट-जी (Aditya Birla SL Gold Direct-G)
NAV: 16.7276
1 महिना परतावा: -1.74 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.58
6 महिन्यात परतावा: 12.33
1 वर्ष परतावा: 14.00
3 वर्षे परतावा: 17.37
अधिक वाचा : LIC Plan | हा आहे एलआयसीचा सुपरहिट प्लॅन! ४ वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि मिळवा बंपर फायदे...
कोटक गोल्ड डायरेक्ट-जी (Kotak Gold Direct-G)
NAV: 22.55
1 महिना परतावा: 3.13 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.26
6 महिन्यात परतावा: 11.72
1 वर्षाचा परतावा: 13.45
3 वर्षे परतावा: 17.97
अॅक्सिस गोल्ड डायरेक्ट-जी (Axis Gold Direct-G)
NAV: 17.48
1 महिना परतावा: 1.51 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.50
6 महिन्यात परतावा: 11.74
1 वर्षाचा परतावा: 13.04
3 वर्षे परतावा: 17.77
क्वांटम गोल्ड सेव्हिंग्ज डायरेक्ट-जी (Quantum Gold Savings Direct-G)
NAV: 21.10
1 महिना परतावा: 1.08 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.43
6 महिन्यात परतावा: 11.77
1 वर्षाचा परतावा: 12.96
3 वर्षे परतावा: 17.32
एचडीएफसी गोल्ड डायरेक्ट-जी (HDFC Gold Direct-G)
NAV: 17.25
1 महिना परतावा: 1.10 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.34
6 महिन्यात परतावा: 11.86
1 वर्ष परतावा: 13.03
3 वर्षे परतावा: 17.71
अधिक वाचा : Petrol Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील दर
निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग्स डायरेक्ट-जी (Nippon India Gold Savings Direct-G)
NAV: 22.16
1 महिना परतावा: 0.99 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.32
6 महिन्यात परतावा: 11.64
1 वर्षाचा परतावा: 12.72
3 वर्षे परतावा: 17.10
आयसीआयसीआय प्रू रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्ज (एफओएफ) डायरेक्ट-जी (ICICI Pru Regular Gold Savings (FOF) Direct-G)
NAV: 17.65
1 महिना परतावा: 1.37 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.23
6 महिन्यात परतावा: 11.33
1 वर्षाचा परतावा: 13.18
3 वर्षे परतावा: 17.10
इन्वेस्को इंडिया गोल्ड डायरेक्ट-जी (Invesco India Gold Direct-G)
NAV: 16.25
1 महिना परतावा: 0.69 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.82
6 महिन्यात परतावा: 11.77
1 वर्ष परतावा: 12.06
3 वर्षे परतावा: 18.13
एसबीआय गोल्ड डायरेक्ट-जी (SBI Gold Direct-G)
NAV: 16.78
1 महिना परतावा: 1.70 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.29
6 महिन्यात परतावा: 11.59
1 वर्षाचा परतावा: 13.02
3 वर्षे परतावा: 17.81
आयडीबीआय गोल्ड डायरेक्ट-जी (IDBI Gold Direct-G)
NAV: 14.98
1 महिना परतावा: 1.57 टक्के
3 महिन्यात परतावा: 10.23
6 महिन्यात परतावा: 11.92
1 वर्षाचा परतावा: 14.47
3 वर्षे परतावा: 17.15
पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड ही एक आदर्श गुंतवणूक आहे. सोन्याचा बाजार इतर बाजारांप्रमाणेच सट्टा आणि अस्थिरतेच्या अधीन आहे
स्रोत- https://economictimes.indiatimes.com/
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. कोणतीही गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)