Sukanya Samriddhi Yojana Update : नवी दिल्ली : जर तुम्ही देखील मुलीचे वडील असाल आणि तुमच्या लाडक्या लेकीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सरकारद्वारे संचालित सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)हा एक उत्तम गुंतवणूक (Investment)पर्याय आहे. जर तुमच्या मुलीला भविष्यात कधीही पैशाची अडचण येऊ असे वाटत असेल, तिचे भविष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर राहावे असे वाटत असेल, तर तुम्हीही सरकारच्या या जबरदस्त गुंतवणूक योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुम्ही या खास योजनेत गुंतवणूक केली तर तुमची मुलगी (Investment for Daughter) 21 वर्षात करोडपती होईल. तुम्हाला या योजनेत जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त या विशेष योजनेसाठी दररोज 416 रुपये वाचवावे लागतील. दररोज 416 रुपयांची ही बचत नंतर तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपयांची मोठी रक्कम उभारून देईल. सुकन्या समृद्धी योजना काय आहे, तिचे फायदे काय, वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घ्या. (If you want to invest in Sukanya Samriddhi Yojana, know the major changes in scheme)
अधिक वाचा : EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे
सुकन्या समृद्धी योजना ही अशी दीर्घकालीन योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल तजवीज करून शकता. यासाठी तुम्हाला खूप पैसे गुंतवण्याचीही गरज नाही. या योजनेत अनेक मोठे बदल होत आहेत. नवीन नियमांनुसार खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल.
पूर्वीचा नियम असा होता की मुलगी 10 वर्षांनंतरच खाते चालवू शकते. परंतु नवीन नियमांनुसार, मुलीला 18 वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी मिळणार नाही. त्याआधी, फक्त पालक खाते चालवायचे.
अधिक वाचा : Ration Card Update: रेशन घेण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या रेशन कार्डशी संबंधित नवीन तरतुदी
खात्यात वर्षाला किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा न केल्यास, खाते डीफॉल्ट मानले जाते. परंतु नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत, खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल. यापूर्वी, डिफॉल्ट खाती पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू दराने व्याजासाठी पात्र होती.
यापूर्वी या योजनेत 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघांचे खाते उघडण्याची तरतूद आहे.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेले खाते पहिल्या दोन परिस्थितींमध्ये बंद केले जाऊ शकते. पहिले कारण मुलगी मरण पावली तर दुसरे कारण मुलीचा पत्ता बदलला तर. मात्र नव्या बदलानंतर खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.