जर आपण आपल्या पगारातूनही (Salary) पीएफ खात्यात (PF account) पैसे (money) जमा करत असाल तर जेव्हा फारच गरज (need) असेल तेव्हाच हे पैसे काढा. अनेकदा जेव्हा आपण पीएफ खात्यातील पैसे पाहतो तेव्हा गरज नसतानाही काहीवेळा ते पैसे काढतो (withdrawal) आणि खर्चही (spending) करतो. ही आपली बचत (savings) आहे आणि हळूहळू हीच बचत आपले पैसे कित्येक पटींनी वाढवू (increase) शकते. पीएफ खात्यातील रकमेवर चांगले व्याज (good interest) मिळते, त्यामुळे फार गरज असेल तेव्हाच यातले पैसे काढा.
जर आपण आपल्या बाजूने पैसे काढलेत तर काढलेल्या पैशांच्या दसपट रकमेचा आपल्या निवृत्तीनिधीवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते. मनी9च्या बातमीनुसार EPFOचे निवृत्त सहाय्यक कमिशनर ए.के. शुक्ला सांगतात की जर आपल्या निवृत्तीला 30 वर्षे बाकी असतील आणि जर आपल्या पीएफ खात्यातून आपण 10 लाख रुपये काढलेत तर आपल्या निवृत्तीनिधीतून 11.55 लाख रुपये कमी होतील. जर आपण हे 1 लाख रुपये तसेच ठेवलेत तर त्यावर व्याज मिळत राहील आणि ही रक्कम 11.55 लाखांवर पोहोचेल.
जर आपल्याला फारच गरज नसेल तर पीएफ खात्यातून पैसे काढू नका. जर आपण ही रक्कम 58व्या वर्षापर्यंत जमा होऊ दिली तर तेव्हा ही रक्कम खूप जास्त झालेली असेल. सध्या यावर 8.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. अशाप्रकारच्या सर्व छोट्या बचत योजनांपैकी हे सर्वात जास्त व्याज आहे. त्यामुळे जितकी मोठी रक्कम आपण पीएफमध्ये गुंतवाल तेवढा जास्त फायदा होईल आणि जितकी जास्त रक्कम आपण काढाल तितके आपले नुकसान होण्याचा धोका वाढेल.
अंदाज लावायचा झाला तर जर आपण 20 वर्षांनी निवृत्त होणार असाल आणि आपण 50 हजार रुपये काढलेत तर आपले 2 लाख 5 हजारांचे नुकसान होईल. याचप्रकारे 1 लाखावर 5 लाख 11 हजार, 2 लाखांवर 10 लाख 22 हजार, 3 लाखावर 15 लाख 33 हजार रुपयांपर्यंत नुकसान होईल.