ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड

TDS Refund : प्राप्तिकर आणि त्याच्याशी निगडीत नियम हे सर्वांसाठीच महत्त्वाचे असतात. अनेकजणांचा टीडीएस त्यांच्या मिळकतीतून कापला जात असतो. टीडीएस मिळवण्यासाठी, तुम्ही 31 जुलै 2022 पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे आवश्यक आहे. रिटर्न भरताना या गोष्टीचा उल्लेख करा. इन्कम टॅक्स स्लॅब अंतर्गत येणाऱ्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR return)भरणे बंधनकारक आहे.

How to get TDS refund
टीडीएसचा रिफंड कसा मिळवावा 
थोडं पण कामाचं
  • 31 जुलै 2022 पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे आवश्यक
  • जे लोक इन्कम टॅक्स स्लॅबच्या खाली आहेत त्यांनी देखील आयटीआर भरण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
  • ज्या लोकांचा पगार प्राप्तिकर स्लॅबमध्ये येत नाही, अशा लोकांसाठी कापलेली टीडीएस रक्कम परत केली जाणार

Income Tax Return : नवी दिल्ली : प्राप्तिकर आणि त्याच्याशी निगडीत नियम हे सर्वांसाठीच महत्त्वाचे असतात. अनेकजणांचा टीडीएस त्यांच्या मिळकतीतून कापला जात असतो. टीडीएस मिळवण्यासाठी, तुम्ही 31 जुलै 2022 पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे आवश्यक आहे. रिटर्न भरताना या गोष्टीचा उल्लेख करा. इन्कम टॅक्स स्लॅब अंतर्गत येणाऱ्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR return)भरणे बंधनकारक आहे. मात्र तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की जे लोक इन्कम टॅक्स स्लॅबच्या खाली आहेत त्यांनी देखील आयटीआर भरावा.  2021-2022 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे पोर्टल उघडले आहे. अशा परिस्थितीत, 31 जुलै 2022 पूर्वी टॅक्स रिटर्न  भरणे आवश्यक आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांचा पगार प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या कर स्लॅबमध्ये येत नाही परंतु, त्यांचा TDS दरमहा कापला जातो. (If your TDS is deducted even if you have low salary, then do this for refund)

अधिक वाचा : Income from YouTube | युट्युबवर दर महिन्याला करा 2 लाखांची कमाई, फक्त व्हिडिओ अपलोड करताना करू नका या चुका...

अशा परिस्थितीत आपले नुकसान झाले असे लोकांना वाटते, पण तसे नाही. ज्या लोकांचा पगार प्राप्तिकर स्लॅबमध्ये येत नाही, अशा लोकांसाठी कापलेली टीडीएस रक्कम परत केली जाईल. यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागेल. प्राप्तिकर  विभाग कपात केलेली रक्कम तुमच्या खात्यात परत करतो.

अशा प्रकारे कापलेला टीडीएस परत मिळेल

टीडीएस मिळविण्यासाठी, तुम्ही 31 जुलै 2022 पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. रिटर्न भरताना या गोष्टीचा उल्लेख करा. यानंतर तुमचे अतिरिक्त पैसे जे टीडीएस म्हणून कापले जातात ते तुमच्या खात्यात येतील. याशिवाय, टीडीएम कापून घेण्यासाठी, तुम्ही फॉर्म 15G भरून बँकेत सबमिट करू शकता. यानंतरही तुम्हाला टीडीएसचे पैसे परत मिळतील.

अधिक वाचा : Income Tax Tips | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे का? कशी कराल करबचत? या आहेत करबचतीच्या टिप्स...

रिफंडची स्थिती तपासण्याची प्रक्रिया-

तुम्हाला लवकरात लवकर परतावा मिळवायचा असेल तर लवकरात लवकर ITR फाइल करा. यानंतर, तुम्ही www.incometax.gov.in या वेबसाइटवर क्लिक करून पेमेंटची स्थिती जाणून घेऊ शकता. यूजर आयडी आणि पासवर्ड टाका. यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल. View File Returns वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ITR चे तपशील दाखवले जातील.

अधिक वाचा : PAN-Aadhaar Linking | तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल? पाहा सोपी पद्धत

नोकरदारांसमोर कर नियोजन (Tax Planning) करताना सर्वात मोठा मुद्दा असतो तो म्हणजे प्राप्तिकराचा. प्राप्तिकरात सूट मिळण्यासाठी काही ठराविक गुंतवणूक केली जाते. साधारणपणे, नोकरी करणाऱ्या लोकांना पगाराचा एक भाग म्हणून घरभाडे भत्ता (HRA) मिळतो. जे करदाते भाड्याच्या घरात राहतात ते दिलेल्या घरभाड्याची वजावट प्राप्तिकर नियमांद्वारे घेऊ शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की जे लोक पगारावर अवलंबून नाहीत म्हणजेच ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे नोकरदार आहेत आणि भाड्याच्या घरात राहतात मात्र त्यांना HRA मिळत नाही अशांना देखील करवजावटीचा लाभ मिळतो. या प्रकारे HRA न घेता भाड्याच्या घरात राहणारे नोकरदार भाड्याच्या स्वरूपात भरलेल्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट (Tax deduction) घेऊ शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी