IIT Campus| आयआयटीमध्ये नोकऱ्यांचा पूर, पहिल्याच टप्प्यात ९,००० विद्यार्थ्यांना बंपर ऑफर, १ कोटींचा पगार

IIT Campus| आयआयटी (IIT) या देशातील अतिशय प्रतिष्ठित संस्थेतदेखील सध्या कॅम्पस सिलेक्शनची प्रक्रिया सुरू आहे. नामवंत कंपन्या येऊन शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड करत आहेत आणि त्यांना जबरदस्त ऑफर देत आहेत. पहिल्याच टप्प्यात देशातील ८ टॉप आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना (IIT campus) ९००० नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये १६० जॉब ऑफर तर वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या आहेत. कोरोना संकटकाळानंतर यावर्षी नोकऱ्यांची चलती दिसून येते आहे.

IIT Campus Placement & Bumper offers
आयआयटीच्या विद्यार्थ्यांना बंपर ऑफर्स 
थोडं पण कामाचं
  • आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटची धूम, नोकऱ्यांची बरसात
  • आयआयटीच्या विद्यार्थ्यांना १ कोटींचा दणदणीत पगार
  • यावर्षी मोठ्या संख्येने मिळाल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या

IIT Campus Jobs| नवी दिल्ली : सध्या देशातील विविध संस्था आणि महाविद्यालयांमध्ये कॅम्पस इंटरव्यूह (Campus placement) आणि नोकऱ्यांचा सीझन (jobs season) सुरू आहे. आयआयटी (IIT) या देशातील अतिशय प्रतिष्ठित संस्थेतदेखील सध्या कॅम्पस सिलेक्शनची प्रक्रिया सुरू आहे. नामवंत कंपन्या येऊन शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड करत आहेत आणि त्यांना जबरदस्त ऑफर देत आहेत. पहिल्याच टप्प्यात देशातील ८ टॉप आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना (IIT campus) ९००० नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये १६० जॉब ऑफर तर वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या आहेत. कोरोना संकटकाळानंतर यावर्षी नोकऱ्यांची चलती दिसून येते आहे. यावर्षी वेतनातील सरासरी वृद्धी १५ ते ३५ टक्क्यांदरम्यान आहे. कॅम्पस प्लेसमेंटच्या दृष्टीने हे वर्ष जबरदस्त ठरले आहे. (IIT campus flooded with job offers, students get hefty packages of Rs 1 crore this year)

२७ विद्यार्थ्यांना मिळाली १ कोटी रुपयांच्या पगाराची ऑफर

आयआयटीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आयआयटी मद्रासच्या २७ विद्यार्थ्यांना यंदा १ कोटी रुपयांच्या बंपर पगाराची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती कॉलेजचे ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट सल्लागार सीएस शंकर यांनी दिली आहे. मागील वर्षी कॉलेजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला १ कोटी रुपयांच्या पगाराची ऑफर मिळाली नव्हती. सर्वात म्हणजे यंदा मिळालेल्या मोठ्या ऑफर या आंतरराष्ट्रीय आणि देशातील अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांकडून मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात आयआयटी मद्रासच्या १,३२७ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर मिळाल्या आहेत. मागील वर्षी १,०१७ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती. यंदा नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या ७७ टक्के विद्यार्थ्यांना ऑफर मिळाल्या आहेत.

आयआयटी कानपूरच्या १,३३० विद्यार्थ्यांना ऑफर

आयआयटीच्या कानपूर कॅम्पसमधील १,३३० विद्यार्थ्यांना जॉब ऑफर मिळाली आहे. या विद्यार्थ्यांची सरासरी सॅलरी यावर्षी ३५ टक्क्यांनी वाढली आहे. तर आयआयटी रुरकी येथील १,२४३ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यामध्ये ३२ नोकऱ्या परदेशी कंपन्यांनी दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात कॅम्पस प्लेसमेंटसाठी २८१ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्यांच्या निवडप्रक्रियेत नोकरी करू इच्छिणाऱ्या जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. 

आयआयटी बॉम्बे, दिल्ली, खरगपूर

पहिल्या टप्प्यात आयआयटी दिल्लीच्या १,२५० विद्यार्थ्यांना, आयआयटी बॉम्बेच्या १,३८२ विद्यार्थ्यांना, आयआयटी खरगपूरच्या १,६०० विद्यार्थ्यांना आणि आयआयटी गुवाहाटीच्या ८४३ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर मिळाल्या आहेत. 

१ कोटीचे पॅकेज

एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मद्रासचे २७, आयआयटी कानपूरचे ४९, आयआयटी दिल्लीचे ३० विद्यार्थी आहेत. आयआयटी रुरकीच्या ११ आणि आयआयटी गुवाहाटीच्या ५ विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तर आयआयटी खरगपूरचे २०, आयआयटी बॉम्बेचे १२ आणि आयआयटी बीएचयुचे २ विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांच्या पगाराची ऑफर मिळाली आहे. या एक कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये स्टॉक ऑप्शन, बोनस, व्हेरिएबल पे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्स आणि इतर घटकांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी