IMF projects Indian economy to grow at 6.1 percent in 2023, global growth to dip to 2.9 percent : आयएमएफने (International Monetary Fund - IMF) भारतासह जगातील सर्व देशांचा ग्रोथ रेट आणि आर्थिक प्रगती या संदर्भातला वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात नमूद आकडेवारीनुसार भारताचा 2022-23 मधील ग्रोथ रेट 6.1 टक्के राहणार आहे. याआधी 2021-22 मध्ये भारताचा ग्रोथ रेट 6.8 टक्के होता. जगाचा ग्रोथ रेट 2022-23 मध्ये 2.9 टक्के राहील. याआधी 2021-22 मध्ये जगाचा ग्रोथ रेट 3.4 टक्के होता. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेली लढाई तसेच कोरोना संकटाचा जागतिक अर्थचक्रावर झालेला परिणाम आणि महागाई यामुळे भारतासह जगाच्या ग्रोथ रेटवर परिणाम झाल्याचा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.
निर्माण झालेल्या आव्हानांतून भारतासह जग मार्ग काढेल. यामुळेच 2023-24 मध्ये भारताचा ग्रोथ रेट 6.8 टक्के तर जगाचा ग्रोथ रेट 3.1 टक्के राहील असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. ही आकडेवारी जाहीर करत आर्थिक स्थिती 2023-24 मध्ये सुधारेल असा विश्वास आयएमएफने व्यक्त केला आहे.
रशिया-युक्रेन लढाई, कोरोना संकट आणि महागाई याचा अनेक देशांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या आव्हानांतून सावरणे छोट्या देशांसाठी कठीण आहे. पण भारतासारखे मोठे देश या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यास सक्षम आहेत, असे मत आयएमएफने व्यक्त केले आहे.
आयएमएफ (International Monetary Fund - IMF) म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. या संस्थेचे मुख्यालय अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथे आहे. आयएमएफ या संस्थेत 184 सदस्य देश आहेत. जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी आयएमएफ कार्यरत आहे. सर्व देश एकमेकांशी सहकार्य करावे आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये संतुलन राहावे यासाठी आयएमएफ काम करते. आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय व्यापार, रोजगाराला चालना देणे, आर्थिक वृद्धी सुनिश्चित करणे यासाठीही आयएमएफ कार्यरत आहे.
Modi सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, आता PM किसानमध्ये 6 नव्हे तर 8 हजार मिळणार