SBI Gold Loan: पात्रता, व्याजदर, लोनची रक्कम आणि प्रोसेसिंग फीसह इतर महत्वाची माहिती

देशातील सर्वात मोठा कर्जदाता असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वैयक्तिक सोने कर्ज देतो ज्यात ग्राहक 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.

Gold loan
पात्रता, व्याजदर, लोनची रक्कम आणि प्रोसेसिंग फीसह इतर महत्वाची माहिती  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 18 वर्षांवरील सर्वांसाठी उपलब्ध आहे सोने कर्ज
  • सोने कर्जाबद्दल स्टेट बँकेने दिली माहिती
  • काय आहेत या कर्जाबद्दलचे तपशील?

नवी दिल्ली: ज्या लोकांकडे आपातकालीन काळात (Emergency situations) आर्थिक संकटांतून (financial crisis) मार्ग काढण्यासाठी आपातकालीन फंड (emergency fund) उपलब्ध आहे ते सामान्यतः अशा परिस्थितीत सोने तारण कर्ज (gold loans) घेतात. वैयक्तिक कर्जाच्या (personal loan) तुलनेत सोने कर्ज हा नेहमीच एक चांगला पर्याय असतो, कारण यात व्याजदर (interest rate) कमी असतो. सोबतच यात आपल्याला लवचिक पुनर्भुगतानाचा पर्यायही मिळतो.

18 वर्षांवरील सर्वांसाठी उपलब्ध आहे सोने कर्ज

देशातील सर्वात मोठा कर्जदाता असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वैयक्तिक सोने कर्ज देतो ज्यात ग्राहक 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. चांगली गोष्ट अशी की गोल्ड लोन घेण्यासाठी आपल्याला कोणताही उत्पन्न पुराव्याची माहिती देण्याची गरज नसते. सामान्यतः बँक लोन म्हणून सोन्याच्या किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम दिली जाऊ शकते.

सोने कर्जाबद्दल स्टेट बँकेने दिली माहिती

भारतीय स्टेट बँकेने नुकतेच ट्वीट करत सोने कर्जाबद्दल माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'बिजनेससाठी चांगली गुंतवणूक हवी असेल तर आधी एसबीआयचा विचार करा. एसबीआयमध्ये सोने कर्जासाठी अर्ज करा आणि 7.50 टक्के व्याजदर आणि शून्य प्रोसेसिंग फीजसारख्या अन्य आकर्षक डील्सचा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी 7208933143वर मिस्ड कॉल द्या किंवा 7208933145वर GOLD असे लिहून मेसेज करा.' या एसबीआयच्या गोल्ड लोनबद्दल विस्तारित माहिती जाणून घ्या.

पात्रता मानदंड

वय: 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती एसबीआयच्या गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकते.

व्यवसाय: बँकेचे कर्मचारी, वेतनधारकांसह उत्पन्नाचा स्थिर स्रोत असलेली कोणतीही व्यक्ती. (वैयक्तिक किंवा संयुक्तरुपात) या कर्जासाठी अर्ज करताना उत्पन्नाचा कोणताही स्रोत दाखवण्याची आवश्यकता नाही.

मर्यादा

कमाल कर्जाची रक्कम: 50 लाख रुपये

किमान कर्जाची रक्कम: 20,000 रुपये

मार्जिन

गोल्ड लोन: 25 टक्के

लिक्विड गोल्ड लोन: 25 टक्के

बुलेट रीपेमेंट गोल्ड लोन: 35 टक्के

प्रोसेसिंग फीस: कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के+जीएसटी. योनो अॅपद्वारे अर्ज केल्यास कोणतीही प्रोसेसिंग फी लावली जाणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी