Fitment Factor update: नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance)३ टक्क्यांनी वाढ केली आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत (Fitment Factor)अपडेट आले आहे. सरकार यंदा फिटमेंट फॅक्टरमध्ये किंचित वाढ करेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. परंतु, फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. (Important news for Fitment factor of government employees, this year no rise)
अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढणार नाही. सध्या सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या बाजूने नाही. कोरोना महामारी (Covid-19)आणि महागाईमुळे (Inflation) हा अतिरिक्त आर्थिक बोजा सध्या वाढवता येणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वेतन आयोगापर्यंत फिटमेंट फॅक्टरवर कोणताही निर्णय होणे शक्य नाही. पुढील वेतन आयोग कधी येईल हे सांगणेही कठीण आहे. सरकार असा फॉर्म्युला बनवण्याचा प्रयत्न करते आहे की ज्यामुळे वेळोवेळी पगार वाढेल.
अधिक वाचा : PAN-Aadhaar linking | तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल ते जाणून घ्या...करा मुदतीत पॅन-आधार लिंकिंग
खरं तर, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी दीर्घकाळापासूनची मागणी होती. दुसरीकडे, मार्च महिन्याच्या पगारात वाढीव फिटमेंट फॅक्टर जाहीर केला जाऊ शकतो, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आता या आघाडीवर कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.
अधिक वाचा : Baba Ramdev | बाबा रामदेव यांची कमाल, एका झटक्यात रुचि सोया झाली कर्जमुक्त, कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी
7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या मूळ पगाराचे कॅल्क्युलेशन 7व्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) फिटमेंट फॅक्टर 2.57 ला गुणाकार करून केले जाते. 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, 6 व्या वेतन आयोगाच्या वेतन बँडमध्ये ग्रेड-पे जोडून मूळ वेतन करण्यात आले. यामध्ये, सध्याच्या एंट्री लेव्हलचा पगार हा फिटमेंट फॅक्टर 2.57 ने गुणाकार करून ठरवण्यात आला होता. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पे बँडनुसार पगार ठरवला गेला होता.
केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३४ टक्क्यांवर पोचला आहे. पण आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. ती अशी की, महागाई भत्त्यासोबतच इतर भत्तेही वाढू शकतात. या भत्त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा भत्ता हा घरभाडे भत्ता (HRA)आहे. आता लवकरच घरभाडे भत्त्यादेखील वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढू शकतो. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार HRA मध्ये पुढील सुधारणा 3 टक्के असेल. कमाल HRA दर 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहे. जे केंद्रीय कर्मचारी X श्रेणीत येतात त्यांना 27 टक्के HRA मिळतो आहे. Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा HRA 18 टक्क्यांवरून वाढून 20 टक्के असेल. त्याच वेळी, झेड वर्गाचा एचआरए 9 टक्क्यांवरून 10 टक्के होईल.