Gautam Adani's Prediction : भारत 2050 पर्यत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार, गौतम अदानींचा अंदाज

Gautam Adani latest : भारताची अर्थव्यवस्था 2050 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असे मत अकाउंटंट्सच्या 21व्या जागतिक परिषदेमध्ये बोलताना अदानींनी व्यक्त केले. या परिषदेत त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ, सध्याची स्थिती आणि आगामी काळातील शक्यता याविषयी आपले मत व्यक्त केले. पुढील दशकात, भारत दर 12 ते 18 महिन्यांनी आपल्या जीडीपीमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची भर घालण्यास सुरुवात करेल असा अंदाज अदानींनी व्यक्त केला.

Gautam Adani
गौतम अदानी 
थोडं पण कामाचं
  • सर्वात श्रीमंत भारतीय असलेल्या गौतम अदानींचा अंदाज
  • भारतीय अर्थव्यवस्था 2050 पर्यत जगातील दुसऱ्या क्रमांकाची होणार
  • 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार 45 ट्रिलियन डॉलरपेक्षा असणार

Indian Economy : मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा अंदाज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्यक्त केला आहे. मागील 58 वर्षात देशाची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची (GDP) झाली आहे. यापुढील काळात तेव्हढाच जीडीपी दर 12-18 महिन्यांनी वाढत जाईल. भारताची अर्थव्यवस्था 2050 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असे मत अकाउंटंट्सच्या 21व्या जागतिक परिषदेमध्ये बोलताना अदानींनी व्यक्त केले. या परिषदेत त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ, सध्याची स्थिती आणि आगामी काळातील शक्यता याविषयी आपले मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, लागोपाठ येणाऱ्या जागतिक संकटांमुळे अनेक गोष्टींवर प्रभाव पडला आहे. यात चीनने पाश्चात्य लोकशाही तत्त्वे अंगीकारली पाहिजेत, धर्मनिरपेक्ष तत्त्वे सार्वत्रिक आहेत, युरोपियन युनियन एकत्र राहतील आणि रशियाची जगातील भूमिक मर्यादित होत जाईल अशा अनेक बाबी आहेत. (In 2050 Indian economy will become second largest economy in world, predicted Gautam Adani)

अधिक वाचा  : लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा हे तुळशीचे उपाय

जागतिक व्यवस्था

अनेक पातळ्यांवरील संकटांमुळे जगात एकच महासत्ता असेल किंवा जगात दोन महासत्ता असतील या अंदाजांना धक्का बसला आहे. "माझ्या मते - या उदयोन्मुख बहुध्रुवीय जगामध्ये अशा महासत्ता अशा असणे आवश्यक आहे ज्या संकटात इतरांना मदत करण्याची जबाबदारी घेतात आणि इतर राष्ट्रांना अधीन होण्यासाठी धमकावत नाहीत. या महासत्तांनी मानवेताल त्यांचे प्रमुख तत्व मानले पाहिजे. अदानी पुढे म्हणाले की, एक महासत्ता ही एक समृद्ध लोकशाही असणे आवश्यक आहे आणि तरीही "लोकशाहीची कोणतीही एकसमान शैली नाही" यावर विश्वास ठेवला पाहिजे. "भांडवलशाहीची शैली जी वाढीच्या फायद्यासाठी विकासाला चालना देते आणि समाजाच्या रचनेकडे दुर्लक्ष करते. 

अधिक वाचा  : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'

अर्थव्यवस्थेची वाढ

गौतम अदानी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा पाया कदाचित प्रासंगिक झाला असेल आणि बहुसंख्य सरकारने देशाला राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत अनेक संरचनात्मक सुधारणा सुरू करण्याची क्षमता दिली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीसंदर्भात बोलताना अदानी म्हणाले की आपल्या देशाच्या जीडीपीला पहिल्या ट्रिलियन डॉलर्सपर्यत पोचण्यासाठी 58 वर्षे लागली आहेत. मात्र पुढील ट्रिलियनपर्यत पोचण्यासाठी फक्त 12 वर्षे आणि नंतरच्या तिसऱ्या ट्रिलियनसाठी फक्त पाचच वर्षे लागली. पुढील दशकात, भारत दर 12 ते 18 महिन्यांनी आपल्या जीडीपीमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची भर घालण्यास सुरुवात करेल असा माझा अंदाज आहे. तर  2050 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. याचबरोबर भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजारभांडवल 45 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त असेल.

अधिक वाचा  : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका

जीडीपी आणि दरडोई उत्पन्न

सध्या भारताचा जीडीपी 3.5 ट्रिलियन डॉलर असून ती  जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर त्या  तुलनेत, अमेरिकेचा जीडीपी 23 ट्रिलियन डॉलर इतका आहे. अमेरिकेतील शेअर बाजाराचे एकूण बाजारभांडवल 45 ते 50 ट्रिलियन पर्यंत आहे. गौतम अदानी पुढे म्हणाले की 2050 मध्ये भारताचे सरासरी वय फक्त 38 वर्षे असेल. देशाची लोकसंख्या 1.6 अब्ज असेल. त्यावेळेस भारताचे दरडोई उत्पन्न 16,000 डॉलर इतके असेल. आताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा ते 700 टक्क्यांनी जास्त असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी