EPFO Scam: ईपीएफओ ​​अधिकाऱ्यांनीच केला मोठा घोटाळा! खोटे दावे करून पीएफमधून काढले 1000 कोटी

EPFO update : ईपीएफओद्वारेच कर्मचाऱ्यांच्या पीएफचे (PF) व्यवस्थापन केले जाते. कर्मचार्‍यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची हमी देणार्‍या ईपीएफओमध्ये (EPFO) ​​मध्ये कर्मचार्‍यांसह मोठा घोटाळा झाला आहे. मुंबईतील कांदिवली भागात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयात नियुक्त सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्याने (EPFO Officer) कर्मचाऱ्यांची 1000 कोटींची फसवणूक केली आहे. याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे.

EPFO Scam
ईपीएफओच्या अधिकाऱ्यांनी केला घोटाळा 
थोडं पण कामाचं
  • कर्मचार्‍यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची हमी देणार्‍या ईपीएफओमध्ये (EPFO) ​​मध्ये कर्मचार्‍यांसह मोठा घोटाळा
  • मुंबईतील कांदिवली भागात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयात नियुक्त सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्याने 1000 कोटींचा केला घोटाळा
  • ईपीएफओने आरोपी अधिकारी महिंद्र बामणे याला तत्काळ निलंबित केले आणि संपूर्ण प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली.

EPFO Scam Update  :नवी दिल्ली : ईपीएफओद्वारेच कर्मचाऱ्यांच्या पीएफचे (PF) व्यवस्थापन केले जाते. कर्मचार्‍यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची हमी देणार्‍या ईपीएफओमध्ये (EPFO) ​​मध्ये कर्मचार्‍यांसह मोठा घोटाळा झाला आहे. मुंबईतील कांदिवली भागात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयात नियुक्त सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्याने (EPFO Officer)  कर्मचाऱ्यांची 1000 कोटींची फसवणूक केली आहे. याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईपीएफओने आरोपी अधिकारी महिंद्र बामणे याला तत्काळ निलंबित केले आणि संपूर्ण प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली. या फसवणुकीत बामणे यांनी विमान कंपनीतील अनेक  कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाशी संबंधित लोकांनी अनेक कागदपत्रे नष्ट करून बनावट कागदपत्रांच्या मदतीने हा घोटाळा केला आहे. नेमका हा घोटाळा काय आहे हे जाणून घेऊया. (In a big scam, EPFO officer withdrew Rs 1,000 crores through fake claims) 

अधिक वाचा : Sonali Phogat : एकटीच सांभाळ करत होती मुलीचा, 6 वर्षांपूर्वी फार्महाऊसवर सापडला होता पतीचा मृतदेह

ईपीएफओने मोठे पाऊल उचलले

ईपीएफओशी संबंधित सूत्रांनी माहिती दिली की हा मोठा घोटाळा म्हणजेच पीएफची लूट 2019 मध्येच सुरू झाली होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात याला वेग आला. हे प्रकरण उघडकीस येताच ईपीएफओने जेट एअरवेजच्या वैमानिकांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांचे भारतीय पॅनकार्ड आणि बँक चेक मागितले, जेणेकरून ते पीएफचे पैसे परत करू शकतील. एवढेच नाही तर परदेशी वैमानिकांना suchitbhagwat@jetairways.com या मेल आयडीवर पैसे पाठवण्यास सांगितले जात आहे.

अधिक वाचा : Maharashtra Ministers bunglow: राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, पाहा कुठला बंगला कुणाच्या वाट्याला

संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य प्रभाकर बानासुरे म्हणाले, “आरोपींनी कर्मचाऱ्यांचे पीएफ पैसे हडप करण्यासाठी बोगस खाती उघडली आणि नंतर जेट एअरवेजसह बंद झालेल्या कंपन्यांमध्ये फसवणूक करून दावे निकाली काढले. आमचा अंदाज आहे की नियमांचे उल्लंघन आणि कर चुकवेगिरीमुळे EPFO ​​चे सुमारे 1000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा होईल.हे प्रकरण कामगारमंत्र्यांपर्यंत पोचले आहे.

EPFO ची बैठक

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईपीएफओने कडक भूमिका घेतली आहे. हे प्रकरण समोर आल्यावर EPFO ​​च्या IAS अधिकारी आणि कामगार मंत्री यांच्यासोबत 29-30 जुलै रोजी बैठक झाली. विश्वस्त सदस्य सुकुमार दामले सांगतात की, बैठकीत जेट एअरवेजचा मुद्दाही पुढे आला आणि त्याबद्दल चर्चा झाली. कांदिवली शाखेशी संबंधित या प्रकरणाची माहिती कामगारमंत्र्यांना देण्यात आली. यामध्ये परदेशी कर्मचाऱ्यांच्या पीएफमधून पैसे गायब झाल्याची बाबही समोर आली आहे.

अधिक वाचा : Kids Makeup : मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांचा मेकअप करताय? जाणून घ्या साईड इफेक्ट्स

सीबीआय चौकशीची मागणी

प्रभाकर बाणासुरे म्हणाले, मी स्वतः बैठकीला उपस्थित होतो आणि मी जेट एअरवेजच्या पीएफ खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास मुख्य दक्षता अधिकारी जितेंद्र खरे हे करणार असले तरी ते कांदिवलीतील त्याच शाखेत काम करतात. अशा स्थितीत योग्य तपासाची अपेक्षा कमी आहे. त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे, कारण यात अनेक व्हाईट कॉलर कर्मचारीदेखील सहभागी असतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी