Bank holidays in April 2022 | एप्रिल महिन्यात बँकांना 15 दिवस सुट्टया, पाहा लिस्ट

Bank Holidays : बॅंकांच्या सुट्ट्या (Bank Holidays)हा सर्वसामान्य माणसासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण बॅंकिंगशी निगडीत कामे ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची कामे असतात. डिजिटल बॅंकिंगमुळे अनेक कामे घरबसल्या होत असली तरी काही बॅंकेच्या काही कामांसाठी बॅंकांच्या शाखेत (Bank) जावेच लागते. एप्रिल महिन्यात एकूण नऊ सुट्ट्यांसह (Bank Holidays List in April) नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते

April Bank holidays list
एप्रिल महिन्यातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी 
थोडं पण कामाचं
  • देशाच्या विविध भागात विविध स्थानिक सण आणि इतर प्रसंगी बँकांना सुट्टी
  • स्थानिक सणांमुळे विविध राज्यात बॅंकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी
  • बॅंकांच्या सुट्ट्यांसंबंधीचे परिपत्रक आरबीआयकडून जाहीर

Bank Holidays List in April 2022 update : नवी दिल्ली  : बॅंकांच्या सुट्ट्या (Bank Holidays)हा सर्वसामान्य माणसासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण बॅंकिंगशी निगडीत कामे ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची कामे असतात. डिजिटल बॅंकिंगमुळे अनेक कामे घरबसल्या होत असली तरी काही बॅंकेच्या काही कामांसाठी बॅंकांच्या शाखेत (Bank) जावेच लागते. एप्रिल महिन्यात एकूण नऊ सुट्ट्यांसह (Bank Holidays List in April) नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते (शनिवारचे दिवस वगळून). एप्रिल महिन्यात बँका 15 दिवस बंद राहतील परंतु विविध राज्ये आणि शहरे विशिष्ट क्षेत्रातील प्रसंगी किंवा सणांवर अवलंबून सुट्ट्या पाहतील. एप्रिल महिन्यात देशाच्या विविध भागातील विविध शहरात कोणत्या दिवशी बॅंकांना सुट्टी असणार ते जाणून घेऊया. (In April Banks to remain closed for 15 days, Check the list)

भारताच्या सर्व भागांतील सर्व बँकांना सर्व पंधरा दिवस सुटी मिळणार नाही. काही राज्यवार सुट्ट्या देखील आहेत ज्यात सर्व रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार सुट्ट्या असतात. बँकांना भेट देण्यापूर्वी ग्राहकाने बँक शाखेच्या सुट्टीची यादी पाहिली पाहिजे. सुटीच्या दिवशीही ऑनलाइन बँकिंग सुविधा सुरू राहणार आहे. बँक शाखांमध्ये पैसे काढणे आणि ठेवण्यावरच परिणाम होणार आहे.

अधिक वाचा : 31 March Deadline | ही छोटीशी कामे तुम्ही 31 मार्चपर्यंत पूर्ण केलीच पाहिजेत...नाहीतर होईल नुकसान

एप्रिल महिन्यातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी -

एप्रिल 1: बँक खाते वार्षिक बंद करणे — आयझॉल, चंदीगड, शिलाँग आणि शिमला वगळता संपूर्ण भारतात.

2 एप्रिल: गुढी पाडवा/उगादी सण/पहिला नवरात्र/तेलुगु नववर्ष दिन/साजिबू नोंगमापनबा (चेराओबा) — कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, गोवा आणि जम्मू आणि काश्मीर

4 एप्रिल: सरहूल - झारखंड

5 एप्रिल: बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिवस- तेलंगणा

अधिक वाचा : Saving Account Interest Rate | या बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट! बचत खात्याच्या व्याजदरात थेट 1 % वाढ

14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महावीर जयंती/बैसाखी/वैसाखी/तमिळ नववर्ष दिन/चेराओबा/बिजू उत्सव/बोहाग बिहू — मेघालय आणि हिमाचल प्रदेश वगळता संपूर्ण भारतात

15 एप्रिल: गुड फ्रायडे/बंगाली नवीन वर्षाचा दिवस (नबावर्षा)/हिमाचल दिवस/विशू/बोहाग बिहू — राजस्थान, जम्मू आणि श्रीनगर वगळता संपूर्ण भारतात

16 एप्रिल: बोहाग बिहू - आसाम

21 एप्रिल: गरिया पूजा - त्रिपुरा

29 एप्रिल: शब-ए-कदर/जुमत-उल-विदा — जम्मू आणि काश्मीर

अधिक वाचा : Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दरवाढ

वीकेंडच्या सुट्ट्यांची यादी - 

3 एप्रिल : रविवार
9 एप्रिल: दुसरा शनिवार
10 एप्रिल: रविवार
17 एप्रिल : रविवार
23 एप्रिल: चौथा शनिवार
24 एप्रिल : रविवार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा परिस्थितीत बँकांचे काम आटोपण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहून नक्कीच बाहेर पडा, अन्यथा तुमचा दिवस वाया जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी