Bank Frauds : कोणीतरी तुमच्या बँक खात्यातून पैसे उडवले तर? नो टेन्शन...ऑनलाइन फ्रॉडमध्ये तुम्हाला संपूर्ण रक्कम परत मिळेल, पाहा कसे

Cyber Fraud : दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होते आहे. मात्र त्याबरोबरच देशात सायबर फसवणूकही (Cyber crime) वाढत आहे. अलीकडे आर्थिक फसवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या फसवणुकीला अनेक जण बळी पडले आहेत. मात्र एकदा फसवणूक झाल्यानंतर किंवा आपल्या बॅंक खात्यातून (Bank Account) पैसे गेल्यानंतर नेमके काय करायचे? आपली रक्कम परत कशी मिळवायची ? याबद्दल बहुसंख्य लोकांना अद्यापही पुरेशी कल्पना नाही.

How to get back money in case of bank fraud
बॅंक फ्रॉड झाल्यास पैसे परत कसे मिळवाल 
थोडं पण कामाचं
  • बॅंक किंवा ऑनलाइन फ्रॉडच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ
  • बॅंक फ्रॉड झाल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात
  • बॅंक किंवा ऑनलाइन फ्रॉड झाल्यास काय करायचे ते जाणून घ्या

Recovery of money from Bank Frauds:नवी दिल्ली : दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होते आहे. मात्र त्याबरोबरच देशात सायबर फसवणूकही (Cyber crime) वाढत आहे. अलीकडे आर्थिक फसवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या फसवणुकीला अनेक जण बळी पडले आहेत. मात्र एकदा फसवणूक झाल्यानंतर किंवा आपल्या बॅंक खात्यातून (Bank Account) पैसे गेल्यानंतर नेमके काय करायचे? आपली रक्कम परत कशी मिळवायची ? याबद्दल बहुसंख्य लोकांना अद्यापही पुरेशी कल्पना नाही. जर तुम्ही देखील बँकिंग फसवणुकीचे (Bank Fraud) बळी असाल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्वाची प्रक्रिया सांगत आहोत ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. (In case of bank or cyber fraud, you can get back your full money, check details)

अधिक वाचा : SBI New Feature: स्टेट बॅंकेच्या ग्राहकांचा जबरदस्त फायदा, आता घर बसल्या मिळणार 35 लाखांपर्यंतचे कर्ज...पाहा कसे

1. त्वरीत कारवाई करा

तुम्ही बँकिंग फसवणुकीचे बळी असाल, तर तात्काळ कारवाई करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते, जर तुम्ही कोणत्याही बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक व्यवहाराचे बळी ठरलात, तर तुमची जबाबदारीही शून्य होऊ शकते. पण, तुम्ही तुमच्या बँकेला याबाबत तात्काळ कळवले तरच हे होईल.

2. तीन दिवसात रिपोर्ट करा

जर तुम्ही सायबर फ्रॉड किंवा बँकिंग फसवणुकीला बळी पडला असाल आणि तुमच्या खात्यातून पैसे गेले असतील तर त्याबद्दल तीन दिवसांच्या आत तक्रार करा. यासाठी तुम्ही https://www.cybercrime.gov.in/ वर किंवा स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकता.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 23 May 2022 : सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदी मात्र थोडीशी घसरली, पाहा ताजा भाव

3. पैसे परत केले जातील

बँक फ्रॉडच्या बाबतीत जर तुम्ही सायबर फसवणुकीविरोधात कठोर पावले उचलली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. शिवाय तुम्हाला 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे परत मिळू शकतील. तुम्ही बँकिंग किंवा ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) बळी असाल तर गप्प बसू नका. संबंधित माहितीसह, तुम्ही ही माहिती बँकेला लेखी द्यावी आणि तक्रार नोंदवावी.

अधिक वाचा : Restaurant Service Charges: आता रेस्टॉरंटमध्ये जेवण होणार स्वस्त, ग्राहकांना द्यावा लागणार नाही सर्व्हिस चार्ज; सरकारचा नवा आदेश जाणून घ्या

4. ही आहे हेल्पलाइन 

सायबर फसवणुकीमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हेल्पलाइन (National Helpline) 155260 देखील सुरू केली आहे. मात्र, त्याची सुविधा सध्या फक्त छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 7 राज्यांमध्ये उपलब्ध आहे. एका अहवालानुसार, एप्रिल 2009 ते सप्टेंबर 2019 दरम्यान, ऑनलाइन बँकिंग फसवणूकीद्वारे 1.17 लाख लोकांना 615.39 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

अलीकडे लोक त्यांच्या बँकिंगशी संबंधित त्यांचे बहुतेक काम ऑनलाइन (Digital banking) करतात. अशा स्थितीत सायबर गुन्हेगारही (Cyber crime) याचा फायदा घेत आहेत. देशात बँक फसवणुकीच्या (Bank Fraud) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार लोकांना त्यांच्या फसवणुकीत अडकवतात आणि त्यांची बँक खाती काही मिनिटांत रिकामी करतात. यामध्ये सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धती वापरतात. यापैकी एक पद्धत स्मिशिंगची (Smishing) देखील आहे. यामध्ये गुन्हेगार एसएमएसद्वारे (SMS) तुमची फसवणूक करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी