IPO List for December | डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात कमाई मोठी संधी, पाहा कशी...

IPO Investment | शेअर बाजारात (Share market) सध्या आयपीओची (IPO)धूम आहे. आयपीओद्वारे गुंतवणुकदारांसाठी कमाईची मोठी संधी मिळते आहे. ज्यांना आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक (Investment) करायची आहे त्यांच्यासाठी सुगीचे दिवस आहेत. डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात मोठी घडामोड असणार आहे. शेअर बाजारात आयपीओचा पाऊस पडणार आहे. जवळपास १० कंपन्या आपले आयपीओ शेअर बाजारात डिसेंबर महिन्यात आणणार आहेत.

IPO Investment in December
डिसेंबरमध्ये आयपीओद्वारे गुंतवणुकीची संधी 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात डिसेंबर महिन्यात येणार आयपीओचा पाऊस
  • जवळपास १० कंपन्यांचे आयपीओ येणार बाजारात
  • आयपीओद्वारे शेअरमध्ये पैसा गुंतवण्याची संधी

Upcoming IPO List of December | मुंबई : शेअर बाजारात (Share market) सध्या आयपीओची (IPO)धूम आहे. आयपीओद्वारे गुंतवणुकदारांसाठी कमाईची मोठी संधी मिळते आहे. ज्यांना आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक (Investment) करायची आहे त्यांच्यासाठी सुगीचे दिवस आहेत. डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात मोठी घडामोड असणार आहे. शेअर बाजारात आयपीओचा पाऊस पडणार आहे. जवळपास १० कंपन्या आपले आयपीओ शेअर बाजारात डिसेंबर महिन्यात आणणार आहेत. या दहा आयपीओमधून कंपन्या जवळपास १०,००० कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहेत. (In December IPO boom in share market)

आयपीओचे दिवस

नोव्हेंबर महिन्यातदेखील आयपीओ मोठ्या संख्येने आले होते. १० कंपन्यांनी बाजारात आपल्या शेअर्सची नोंदणी केली होती. सध्या स्टार हेल्थ अॅंड अलाइड इन्श्युरन्स, टेगा इंडस्ट्रीज आणि आनंद राठी वेल्थ लिमिटेडच्या आयपीओचे सब्सक्रिप्शन बाजारात खुले आहेत. स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर म्हणजे आज होती. तर टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओची अंतिम तारीख ३ डिसेंबर आणि आनंद राठीच्या आयपीओची अंतिम तारीख ६ डिसेंबर ही आहे.

लवकर येणार इतर आयपीओ

लवकरच शेअर बाजारात इतर कंपन्यांचेदेखील आयपीओ येणार आहेत. रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीसदेखील आपला आयपीओ घेऊन येते आहे. रेटगेनकडून १,३३५ कोटी रुपयांच्या आयपीओ ७ ते ९ डिसेंबर दरम्यान खुला असणार आहे. याशिवाय मेदांता ब्रॅंड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करणारी ग्लोबल हेल्थ लिमिटेड, फार्मसी रिटेल चेन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि हेल्थियम मेडटेक या कंपन्यांचादेखील समावेश आहे.

या कंपन्यांच्या आयपीओदेखील तयार

वर उल्लेख केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त मेट्रो ब्रॅंड, श्रीराम प्रॉपर्टीज, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीस, श्री बजरंग पॉवर अॅंड इस्पात आणि व्हीएलसीसी हेल्थ केअर या कंपन्यांचे आयपीओ डिसेंबर महिन्यात बाजारात येणार आहेत. या सर्व कंपन्यांच्या आयपीओद्वारे शेअर बाजारातून १०,००० कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी होणार आहे. या कंपन्या व्यवसाय विस्तार, कर्जाची परतफेड आणि कंपनीच्या कामकाजासाठी भांडवलाची उभारणी करत आहेत. या आयपीओद्वारे कंपनीचे प्रवर्तक आपल्या हिश्याचे काही शेअर्स शेअर बाजारात विकणार आहेत. 

शेअर बाजारातील ट्रेंड

आज दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७७६ अंशांनी वधारून ५८४६१.२९ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३४ अंशांनी वाढून १७,४०१.६५  अंशावर बंद झाला. मागील दोन आठवड्यांमध्ये शेअर बाजाराने चढ उतार दोन्ही नोंदवले. मात्र त्यामुळे गुंतवणुकदारांच्या उत्साहावर परिणाम झालेला नाही. विशेषत: तरुण गुंतवणुकादर शेअर बाजाराकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी