Wholesale Inflation | घाऊक महागाई डिसेंबरमध्ये घटून १३.५६ टक्क्यांवर

December WPI : डिसेंबर महिन्यातील घाऊक महागाई दरात म्हणजे घाऊक किंमत निर्देशांकात (December Wholesale Price Index) थोडीशी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) १३.५६ टक्क्यांवर होता. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर १४.२३ टक्के होता. डिसेंबर २०२० मध्ये घाऊक महागाई दर फक्त १.९५ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये ११.९२ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये उत्पादित उत्पादनांच्या विभागातील महागाई दर १०.६२ टक्के होता.

Whole Inflation in December
डिसेंबरमध्ये घाऊक महागाईदरात थोडीशी घट 
थोडं पण कामाचं
  • डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईदरात घट होत तो १३.५६ टक्के
  • नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर १४.२३ टक्के
  • याआधी चार महिने महागाई सातत्याने वाढत होती.

WholeSale Price Index : नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यातील घाऊक महागाई दरात म्हणजे घाऊक किंमत निर्देशांकात (December Wholesale Price Index) थोडीशी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) १३.५६ टक्क्यांवर होता. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर १४.२३ टक्के होता. डिसेंबर २०२० मध्ये घाऊक महागाई दर फक्त १.९५ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये ११.९२ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये उत्पादित उत्पादनांच्या विभागातील महागाई दर १०.६२ टक्के होता. भाजीपाला विभागातील महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये ३.९१ टक्क्यांच्या तुलनेत ३१.५६ टक्के राहिला. अंडी, मांस, माशांची निगडीत महागाई दर ६.६८ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये हा दर ९.६६ टक्के होता. (In December Wholesale Inflation comes down to 13.56 %)

नोव्हेंबरमध्ये जास्त होता महागाईदर

नोव्हेंबर महिन्यात कांद्याची महागाई उणे १९.०८ टक्के होती, तर ती उणे ३०.१० टक्के होती. बटाट्याचा महागाई दर उणे ४२.१० टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये तो उणे ४९.५४ टक्के होता. प्राथमिक वस्तूंच्या महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये १०.३४ टक्क्यांच्या तुलनेत १३.३८ टक्के राहिला. इंधन आणि उर्जा क्षेत्रात ही महागाई ३२.३० टक्के होती आणि नोव्हेंबरमध्ये ती ३९.८१ टक्के होती. त्याच वेळी, अन्नधान्य महागाई डिसेंबरमध्ये ९.२४ टक्के होती, तर नोव्हेंबरमध्ये ती ६.७० टक्के होती.

सलग चार महिने महागाईमध्ये वाढ

याआधी चार महिने महागाई सातत्याने वाढत होती. घाऊक किंमतीवर आधारित महागाई एप्रिलपासून सलग नवव्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महागाई १४.२३ टक्के होती, तर डिसेंबर २०२० मध्ये ती १.९५ टक्के होती. गॅस, रसायने आणि रासायनिक उत्पादने, खाद्यपदार्थ, कापड, कागद आणि कागदी उत्पादने इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही महागाई मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा जास्त आहे. 

किरकोळ महागाईत वाढ

सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation in December) ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये ४.९१ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर २०२१ मध्ये ४.९१ टक्के आणि डिसेंबर २०२० मध्ये ४.५९ टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई ४.०५ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी आधीच्या महिन्यात १.८७ टक्‍क्‍यांवर होती.

नोव्हेंबरमध्ये महागाई पोचली होती विक्रमी पातळीवर

नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाई दर (Wholesale Price Index) (WPI)१२.५४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्क्यांवर पोचला होता. त्यावेळेस घाऊक महागाईदर १२ वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. इंधनाचे दर आणि वीजदर यामध्ये झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंमतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी