CNG Price Update : सीएनजी झाला महाग, पाहा आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग?

CNG price hike : दिल्ली-एनसीसारमध्ये आजपासून सीएनजी गॅस महाग झाला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने आजपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किंमतीत प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन दरवाढीमुळे, सीएनजीची किंमत आता दिल्लीत 73.61 रुपये प्रति किलो, नॉयडामध्ये 76.17 रुपये आणि गुरुग्राममध्ये 81.94 रुपये प्रति किलो आहे. आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणी येथे 123.47 रुपये प्रति लिटर आहे.

CNG price hike
सीएनजीच्या दरात झाली वाढ 
थोडं पण कामाचं
  • दिल्ली-एनसीआरच्या परिसरात आज सीएनजी 2 रुपये प्रति किलोने महागला आहे.
  • देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज बदल नाही
  • परभणीत मिळतेय सर्वात महाग पेट्रोल, 123.47 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today:नवी दिल्ली : दिल्ली-एनसीसारमध्ये आजपासून सीएनजी गॅस महाग झाला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने आजपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किंमतीत प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन दरवाढीमुळे, सीएनजीची किंमत आता दिल्लीत 73.61 रुपये प्रति किलो, नॉयडामध्ये 76.17 रुपये आणि गुरुग्राममध्ये 81.94 रुपये प्रति किलो आहे. दुसरीकडे, देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज सलग 38 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणी येथे 123.47 रुपये प्रति लिटर आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे. तर देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये प्रति लिटर आहे आणि डिझेल 85.83 रुपये प्रित लिटर आहे. (In Delhi CNG prices rises by 2 rupees per kg today)

अधिक वाचा : CNG Car Guide: तुम्ही जर सेकंड हँड सीएनजी कार घेणार असाल, तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे ...चुकूनही या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये/लिटर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 May 2022: धुमधडाक्यात करा लग्न, सोने झाले स्वस्त...पाहा ताजा भाव

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122   या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

अधिक वाचा : PM Kisan yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची यादी जाहीर, लगेच तपासा तुमचे नाव...

पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलसारख्या (Diesel Price) इंधनांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशात जर पेट्रोलचे दर कमी झाले किंवा तुम्हाला स्वस्तातील पेट्रोल जर उपलब्ध झाले तर? पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने नवीन प्रकारचे पेट्रोल बाजारात आणले आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेला पेट्रोलचा नवीन प्रकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतो. 15 टक्के मिथेनॉलचे मिश्रण असलेले  'एम15' पेट्रोल  (M15 Petrol) आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आले आहे. इंडियन ऑइलचे हे नवे पेट्रोल जर बाजारात सर्वत्र उपलब्ध झाले तर महागाईने चिंताग्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी