Goa | गोव्यात टोमॅटो, पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळते आहे 'बियर', भाजीपाला महाग दारू स्वस्त !

Beer price in Goa | पेट्रोल आणि टोमॅटो दोघांचाही भाव सध्या १०० रुपयांच्या जवळपास आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र गोव्यात दारूचे दर स्थिर आहेत. त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. टोमॅटोचे भाव ७० रुपये प्रति किलोपासून सुरू होत आहेत. बियरपेक्षा टोमॅटोचे भाव जास्त आहेत. गोव्यात बियर ही पेट्रोल आणि टोमॅटोपेक्षा स्वस्त झाली आहे.

Beer price in Goa
गोव्यात बियर स्वस्त भाजीपाला महाग 
थोडं पण कामाचं
  • गोव्यात टोमॅटो आणि पेट्रोल दर गगनाला भिडले
  • गोव्यात मिळते स्वस्तात बियर
  • गोव्यात दारूवर सर्वात कमी कर

Liquor in Goa | पणजी : देशात महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराबरोबरच (Petrol price) आता टोमॅटोच्या भावातदेखील (Tomato price)वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात (Goa) बियर ही पेट्रोल आणि टोमॅटोपेक्षा स्वस्त झाली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार गोव्यात एका बियरची किंमत (Beer price in Goa) ही एक लिटर पेट्रोल किंवा एक किलो टोमॅटोपेक्षा स्वस्त आहे. गोव्यात लोकप्रिय असलेली गोवा किंग्स पिल्सनर ६० रुपये प्रति किलोच्या किंमतीने मिळते आहे. तर एक किलो टोमॅटोचा भाव हा पेट्रोलच्या दराशी स्पर्धा करतो आहे. ( In Goa, Beer is more cheaper than tomato & petrol)

गोव्यात दारू स्वस्त भाजीपाला महाग

पेट्रोल आणि टोमॅटो दोघांचाही भाव सध्या १०० रुपयांच्या जवळपास आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र गोव्यात दारूचे दर स्थिर आहेत. त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. टोमॅटोचे भाव ७० रुपये प्रति किलोपासून सुरू होत आहेत. बियरपेक्षा टोमॅटोचे भाव जास्त आहेत. गोव्यात फक्त स्थानिक बियरच टोमॅटोपेक्षा स्वस्त मिळतेय असे नाही तर किंगफिशर किंवा ट्युबोर्गचा ७५० मिलीमीटरची बाटली देखील ८५ रुपये प्रति बोटलच्या किंमतीवर मिळते आहे. यातुलनेत भाजीपाला जास्त महाग झाला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदेखील वाढलेल्या आहेत. गोव्यात सध्या पेट्रोल ९६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७ रुपये प्रति लिटरच्या दराने मिळते आहे.

गोव्यात दारूवर सर्वात कमी टॅक्स

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारलेले आहेत. यामुळे देशभरात इंधनाचे दर वाढलेले आहेत. मात्र गोव्यात दारूवर अत्यंत कमी कर आकारण्यात येतो आहे. देशात दारूवर सर्वात कमी कर गोव्यात आकारण्यात येतो आहे. गोवा राज्य भाजीपाल्यासाठी शेजारील राज्यांवर अवलंबून आहे. इथे हुबळी आणि बेळगावहून रोज जवळपास १५० टन टोमॅटो येतात.

हैराण नागरिक

समोर आलेल्या माहितीनुसार या परिस्थितीमुळे गोव्यातील दुकानदारांमध्ये राग आहे. एका दुकानदाराचे म्हणणे होते की त्यांना आता कोणतीही आशा वाटत नाही. टोमॅटो विकत घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. सोनेदेखील टोमॅटोपुढे फिके पडेल. दुकानदार या वाढीव दरांमुळे त्रस्त झाले आहेत. ग्राहकदेखील या महागाईमुळे हैराण आहेत. टोमॅटो आता ऑमलेटमधून गायब झाले आहेत. तर काही लोक अगदी नाममात्र टोमॅटो विकत घेत आहेत. लोकांना वाटते आहे की लवकरच टोमॅटोच्या किंमती खाली येतील. 

महागाईचा मुद्दा देशभरात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. विविध वस्तूंच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने इंधनाच्या दरात थोडी कपात केली होती. मात्र तरीही महागाईला तोंड देताना नागरिक त्रस्त होत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी