EKI Energy Services: १४ महिन्यातच १ लाख रूपयांचे झाले ३९ लाख रूपये; आता मिळेल बोनस शेअर 

काम-धंदा
Updated Jun 22, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

EKI Energy Services | एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील १४ महिन्यांत लोकांना मालामाल केले आहे. ही कंपनी EKI एनर्जी सर्व्हिसेस आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी १६२ ते ६००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

In just 14 months, money went from Rs 1 lakh to Rs 39 lakh, now company giving bonus share
१४ महिन्यातच १ लाख रूपयांचे झाले ३९ लाख रूपये, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील १४ महिन्यांत लोकांना मालामाल केले आहे.
  • १४ महिन्यातच १ लाख रूपयांचे झाले ३९ लाख रूपये.
  • ही कंपनी EKI एनर्जी सर्व्हिसेस आहे.

EKI Energy Services | नवी दिल्ली : एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील १४ महिन्यांत लोकांना मालामाल केले आहे. ही कंपनी EKI एनर्जी सर्व्हिसेस (EKI Energy Services) आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी १६२ ते ६००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्संनी ३,५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. लक्षणीय बाब म्हणजे कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे, ज्यासाठी EKI एनर्जी सर्व्हिसेसने रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. (In just 14 months, money went from Rs 1 lakh to Rs 39 lakh, now company giving bonus share). 

अधिक वाचा : अभिनेत्याने अग्निपथ योजनेवरून उडवली आनंद महिद्रांची खिल्ली

३:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर करणारी कंपनी

EKI एनर्जी सर्व्हिसेस ३:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर करत आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख १ जुलै २०२० रोजी फिक्स केली आहे. तसेच बोनस जारी करण्याची मुदत ३० जून २०२२ आहे. EKI एनर्जीच्या शेअर्सने रुपये १२,५९९.९५ चा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची लो-लेव्हल ६२३.५० रुपये आहे. ईकेआय एनर्जी कंपनीचे मार्केट कॅप ४३८७ रूपये आहे. 

१ लाख रूपयांचे बनवले ३९ लाखांहून जास्त

EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्संनी मागील १४ महिन्यांत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. ९ एप्रिल २०२१ रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर १६२.०५ रुपयांच्या पातळीवर होते, जे २० जून २०२२ रोजी ६३९० रुपयांच्या पातळीवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्संनी गुंतवणूकदारांना ३८४३ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ९ एप्रिल २०२१ रोजी EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर सध्याचे पैसे ३९.४३ लाख रुपये झाले असते. लक्षणीय बाब म्हणजे कंपनीच्या शेअर्संनी गेल्या वर्षभरात ९२४ टक्के परतावा दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी