LIC Plan | हा आहे एलआयसीचा सुपरहिट प्लॅन! ४ वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि मिळवा बंपर फायदे...

LIC : एलआयसी पॉलिसीमध्ये कोणताही धोका नाही. शिवाय या पॉलिसी बचतीबरोबरच तुमच्या कुटुंबासाठी विमा संरक्षणदेखील उपलब्ध करून देतात. एलआयसीच्या पॉलिसी त्यातील फायदे आणि सुरक्षितता यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. एलआयसीच्या अनेक पॉलिसींपैकी एक खास पॉलिसी आहे, 'जीवन शिरोमणी योजना' (LIC Jeevan Shiromani Plan). ही पॉलिसी सुरक्षिततेबरोबर बचतीची संधीही देते.

LIC Jeevan Shiromani Plan
एलआयसीची जीवन शिरोमणी योजना 
थोडं पण कामाचं
 • एलआयसीच्या अनेक पॉलिसींपैकी एक खास पॉलिसी आहे, 'जीवन शिरोमणी योजना'
 • एलआयसीची ही योजना एक नॉन-लिंक केलेली योजना असून यामध्ये तुम्हाला 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी दिली जाते
 • या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकांना निश्चित कालावधीत पैसे दिले जातात.

LIC Jeevan Shiromani Plan : नवी दिल्ली : तुम्हालाही कुठेतरी मोठी गुंतवणूक (Investment)करून सुरक्षित नफा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो.  एलआयसीने प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांसाठी पॉलिसी (LIC Plan) बाजारात आणल्या आहेत. एलआयसी पॉलिसीमध्ये कोणताही धोका नाही. शिवाय या पॉलिसी बचतीबरोबरच तुमच्या कुटुंबासाठी विमा संरक्षणदेखील उपलब्ध करून देतात. एलआयसीच्या पॉलिसी त्यातील फायदे आणि सुरक्षितता यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. एलआयसीच्या अनेक पॉलिसींपैकी एक खास पॉलिसी आहे, 'जीवन शिरोमणी योजना' (LIC Jeevan Shiromani Plan). ही पॉलिसी सुरक्षिततेबरोबर बचतीची संधीही देते. एलआयसीच्या जीवन शिरोमणी प्लॅनबद्दल विस्ताराने जाणून घ्या. (In LIC Jeevan Shiromani Plan pay premium for 4 years & get the bumper benefits)

अधिक वाचा : Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

एक कोटी रुपयांची हमी रक्कम (LIC Jeevan Shiromani Plan)

एलआयसीच्या जीवन शिरोमणी प्लॅनचे अनेक फायदे आहेत. एलआयसीची ही योजना एक नॉन-लिंक केलेली योजना असून यामध्ये तुम्हाला 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी दिली जाते. या पॉलिसीमध्ये किमान परतावा 1 कोटी रुपये आहे.

अधिक वाचा : SBI Home Loan | गृहकर्जावर स्टेट बॅंक देते टॉपअप लोन, क्षणार्धात करा अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि फायदे

जीवन शिरोमणी प्लॅन काय आहे?

 1. - एलआयसीने 19 डिसेंबर 2017 रोजी ही विशेष योजना सुरू केली.
 2. - ही एक नॉन-लिंक केलेली, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे.
 3. - ही योजना विशेषतः उच्च उत्पन्न वर्गातील व्यक्तींसाठी (NHE) तयार करण्यात आली आहे.
 4. - या योजनेअंतर्गत, गंभीर आजारांसाठी कव्हर उपलब्ध आहे.
 5. - या स्पेशल प्लानमध्ये 3 ऑप्शनल रायडर्स देखील उपलब्ध आहेत.

अधिक वाचा : Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक

जीवन शिरोमणी प्लॅनचे आर्थिक फायदे

 1. - एलआयसीची जीवन शिरोमणी योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाचा पॉलिसीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू लाभाच्या रूपात आर्थिक सहाय्य देते.
 2. - या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकांना निश्चित कालावधीत पैसे दिले जातात.
 3. - यामध्ये मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते.

सर्व्हायव्हल बेनिफिट 

सर्व्हायव्हल बेनिफिटवर म्हणजेच पॉलिसीधारक पॉलिसीचा कालावधी संपताना जर हयात असेल तर पुढीलप्रमाणे पेमेंट मिळते.

 1. - 14 वर्षाची पॉलिसी -10व्या आणि 12व्या वर्ष विम्याच्या 30-30% रक्कम
 2. - 16 वर्षाची पॉलिसी -12व्या आणि 14व्या वर्ष विम्याच्या 35-35% रक्कम
 3. - 18 वर्षांची पॉलिसी - 14व्या आणि 16व्या वर्ष विमा रकमेच्या 40-40% रक्कम
 4. - 20 वर्षांची पॉलिसी -16व्या आणि 18व्या वर्ष विमा रकमेच्या 45-45% रक्कम

या प्लॅनमध्ये मिळते कर्जदेखील 

या पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक त्यांच्या सरेंडर मूल्याच्या आधारावर कर्ज घेऊ शकतात. यामध्ये एलआयसीच्या अटी आणि नियम लागू आहेत. पॉलिसी कर्ज वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदराने दिले जाते.

आयुर्विमा हा तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. यातून तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळते आणि तुमच्या पश्चात कोणत्याही आर्थिक संकटाला तोंड द्यायची वेळ येत नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी