Electricity Bill : सर्वसामान्यांना मोठा फटका! या महिन्यापासून महाराष्ट्रातील वीज बिलात होणार 20-30 टक्क्यांची वाढ

Fuel Adjustment Charges on Electricity : वीजबिल (Electricity Bill) हा सर्वसामान्यांच्या बजेटचा एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र आता सर्वसामान्यांना चांगलाच दणका बसणार आहे. महाराष्ट्रातील वीजबिलात (Maharashtra Electricity bill hike) या महिन्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यापासून, पॉवर युटिलिटी कंपन्या इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charges)(FAC) आकारण्यास सुरुवात करतील, ज्याला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) 1 जून रोजी मान्यता दिली आहे.

Maharashtra Electricity bill update
महाराष्ट्रात वीजबिल वाढणार 
थोडं पण कामाचं
  • सर्वसामान्यांना वीजबिलासंदर्भात चांगलाच दणका बसणार आहे, वीजबिल 30 टक्क्यांपर्यत वाढणार
  • या महिन्यापासून वीजबिलात पॉवर युटिलिटी कंपन्या इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरूवात करणार
  • महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) 1 जून रोजी मान्यता दिली आहे

Electricity Bill Hike : मुंबई : वीजबिल (Electricity Bill) हा सर्वसामान्यांच्या बजेटचा एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र आता सर्वसामान्यांना चांगलाच दणका बसणार आहे. महाराष्ट्रातील वीजबिलात (Maharashtra Electricity bill hike) या महिन्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यापासून, पॉवर युटिलिटी कंपन्या इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charges)(FAC) आकारण्यास सुरुवात करतील, ज्याला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) 1 जून रोजी मान्यता दिली आहे. या शुल्कांमुळे मासिक वीज बिलांमध्ये 20 टक्कयांपर्यत वाढ होऊ शकते. (In Maharashtra electricity bills may hike by 20-30%)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 11 July 2022: डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या भावात घसरण,ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का? पाहा ताजा भाव

सर्व वीज कंपन्यांच्या ग्राहकांना बसणार फटका

महाराष्ट्रातील 10.5 लाख बेस्ट ग्राहक, 7 लाखांहून अधिक टाटा पॉवर ग्राहक, 29 लाख अदानी इलेक्ट्रिसिटी ग्राहक आणि 28 लाख महावितरण ग्राहकांसाठी ही एक मोठी समस्या ठरणार आहे.  निवासी, व्यावसायिक, औद्योगिक इत्यादींसह सर्व ग्राहक गटांसाठी किमान 10% आणि कमाल 20% वाढ असू शकते. FAC इंधन, कोळसा किंवा गॅसच्या चढ-उतार खर्चावर अवलंबून आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात मागील दोन वर्षांसाठी ग्राहकांवर याचा भार टाकण्यात आला नव्हता.

FAC ची गणना मार्च, एप्रिल आणि मे साठी केली जाईल आणि नोव्हेंबर पर्यंत पाच महिन्यांच्या कालावधीत गोळा केली जाईल.

अधिक वाचा : RBI announcement on Rupee settlement : रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा! देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार आता रुपयात होणार...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "जुलैचे बिल प्रथम FAC दर्शवेल." महावितरणच्या एका उच्च अधिकार्‍याने दावा केला, "वीज तयार करण्यासाठी आयात केलेल्या कोळशाचा खर्च लक्षणीय होता, तसेच गॅस-आधारित पॉवर स्टेशनच्या ऑपरेशनल खर्चाप्रमाणे FAC आकारण्यात आला होता."

कोरोना महामारीदरम्यान, एमईआरसीने (MERC) सर्व वीज कंपन्यांना इंधन खर्च पूर्ण करण्यासाठी “FAC स्थिरीकरण निधी” तयार करण्याचे निर्देश दिले होते. “आता जरी FAC आकारला गेला तरी तो तिमाही आधारावर असेल. नियामक आयोग पुढील तीन महिन्यांत एकत्रित रकमेची वसुली करण्यास परवानगी देईल, ”अशी माहिती एमईआरसीच्या एका सूत्राने दिली आहे.

अधिक वाचा : Online Payment Cost : Paytm, PhonePe च्या सुविधा शुल्कामुळे बिल भरणे झाले महाग, अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी वापरा हे पर्याय

सर्वसामान्य माणसासाठी वीजबिलातील वाढ हा एक मोठाच फटका असणार आहे. आधीच महागाईने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनातील होत असलेली वाढ, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमधील वाढ याचा मोठाच फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. मागील काही महिन्यात सीएनजी गॅसदेखील महागला आहे. बाजारातील दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतींमध्ये मागील काही महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे. भाजीपाला आणि अन्नधान्यदेखील महागले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाच्या खिशावर मोठा भार पडत असून दर महिन्याचा खर्च भागवणेदेखील अनेकांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. त्यातच आता वीजबिलात वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी