Gold Rate | महाराष्ट्रात सोने स्वस्त होण्याची शक्यता...राज्य सरकार हा निर्णय घेणार

Gold Stamp duty : सोन्याचा भाव वाढला की सर्वसामान्यांची चिंता वाढते. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्यांना किंवा गुंतवणूक (Investment)करू इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सोन्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कररचेत सुधारणा करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार महाराष्ट्रातील सोने आणि चांदी यांच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Gold in Maharashtra
महाराष्ट्रात सोन्याचा भाव 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात सोन्याच्या भावात घट होण्याची शक्यता
  • राज्य सरकारने मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी स्थापन केली समिती, आयात वाढल्यास सरकारचा महसूल वाढणार
  • मुद्रांक शुल्क कमी केल्याचा सराफा बाजार आणि ग्राहकांना फायदा

Gold Price in Maharashtra | मुंबई : सोन्याचा भाव (Gold Price)हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सोन्याचा भाव वाढला की सर्वसामान्यांची चिंता वाढते. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्यांना किंवा गुंतवणूक (Investment)करू इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सोन्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कररचेत सुधारणा करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार महाराष्ट्रातील सोने आणि चांदी यांच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (In Maharashtra Gold may become cheaper, state government may exempt stamp duty)

राज्य सरकारचे मुद्रांक शुल्क

सध्या महाराष्ट्र सरकार हवाईमार्गे आयात केलेल्या सोन्यावर ०.१ टक्के मुद्रांक शुल्क आकारते. मात्र इतर राज्यांमध्ये हे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे इतर राज्यांमध्ये सोन्याची आयात होते, त्यातुलनेत महाराष्ट्रातील सोन्याची आयात घटली आहे. सोने आयातीवर जीएसटी शुल्कदेखील आकारले जाते त्यामुळे राज्य सरकारच्या महसूलावर त्याचा आधीच परिणाम झाला आहे. त्यामुळे जर मुद्रांक शुल्काच्या पातळीवर राज्य सरकारने दिलासा दिला तर महाराष्ट्राच्या महसूलात वाढ होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.

समितीची स्थापना

सराफा आणि ज्वेलर्स यांच्या मागणीमुळे या विषयावर एक समिती स्थापन करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. इतरत्र सोन्याच्या आयातीवर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही. परिणामी इतर राज्यांमधून व्यापारी सोने आयात करतात. याचा परिणाम महाराष्ट्र सरकारच्या महसूलावर होतो आहे. सरकारची समिती यासंदर्भात आपला अहवाल देणार आहे. ही समिती राज्य सरकारकडून आकारले जाणारे मुद्रांक शुल्क आणि इतर राज्यांची कररचना यांची तुलना करणार आहे. मुद्रांक शुल्क केल्यावर सरकार आणि सराफा बाजारावर होणारा परिणाम इत्यादी बाबी ही समिती लक्षात घेत त्यासंदर्भात अभ्यास करणार आहे.

किती स्वस्त होईल सोने

अर्थात महाराष्ट्र सरकारने जर सोन्यावरील मुद्रांक शुल्क माफ केले तर सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढेल. शिवाय मुंबईतूनच ही आयात झाल्यामुळे जीएसटी संकलनदेखील वाढेल आणि या सर्वांचा फायदा राज्य सरकारच्या तिजोरीला होईल असे सोने व्यापारी असोसिएशनचे मत आहे. दिल्लीतून मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होते आणि तेथून ते देशभर विकले जाते. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क माफ केल्यास सोन्याच्या भावात पाचशे रुपये प्रति १० ग्रॅमची घट होणार आहे. याचा फायदा सराफा बाजार आणि ग्राहक दोघांनाही होणार आहे. 

सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणुकीची संधी

स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंडची पुढील सेरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22) सोमवार १० जानेवारी पासून गुंतवणुकीसाठी खुली होते आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) बाजारात रिझर्व्ह बॅंकेकडून (RBI)आणले जातात. प्रत्येक सेरिजसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया सोन्याचा भाव निश्चित करत असते. नवी सेरिज १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान बाजारात गुंतवणुकीसाठी खुली आहे. या सेरिजसाठी सरकारने सोन्याचा भाव (Gold price) ४,७८६ रुपये प्रति ग्रॅम इतका निश्चित केला आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये डिजिटल स्वरुपातदेखील पेमेंट करता येते. डिजिटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी