ED action on Amway India | अॅम्वे इंडियावर एमएलएम घोटाळ्याचा आरोप...ईडीने जप्त केली कंपनीची तब्बल 757 कोटी रुपयांची मालमत्ता

MLM Scam : सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED) अॅम्वे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (Amway India)या कंपनीच्या मालकीची 757.77 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. अॅम्वे इंडिया मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळा चालवत असल्याचा आरोप आहे. संलग्न मालमत्तांमध्ये दिंडीगुल, तामिळनाडू येथील कंपनीची जमीन आणि कारखाना इमारत समाविष्ट आहे. त्याचबरोबर कंपनीचा कारखाना, यंत्रसामग्री, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे.

Amway India accused of running a multi-level marketing scam
अॅम्वे इंडिया मल्टीलेव्हल मार्केटिंग घोटाळा करत असल्याचा आरोप 
थोडं पण कामाचं
  • ईडीचा अॅम्वे इंडियाला मोठा दणका, जप्त केली 757 कोटी रुपयांची मालमत्ता
  • अॅम्वेचा मनी लॉंडरिंग अंतर्गत तपास सुरू
  • कंपनी मल्टीलेव्हल मार्केटिंगचा घोटाळा करत असल्याचा आरोप

ED attaches assets of Amway India : नवी दिल्ली : सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED) अॅम्वे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (Amway India)या कंपनीच्या मालकीची 757.77 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. अॅम्वे इंडिया मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळा चालवत असल्याचा आरोप आहे. संलग्न मालमत्तांमध्ये दिंडीगुल, तामिळनाडू येथील कंपनीची जमीन आणि कारखाना इमारत समाविष्ट आहे. त्याचबरोबर कंपनीचा कारखाना, यंत्रसामग्री, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे. शिवाय, आर्थिक फसवणूक तपास संस्थेने Amway च्या 36 वेगवेगळ्या खात्यांमधून 411.83 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि 345.94 कोटी रुपयांची बँकेतील रक्कम तात्पुरती जप्त केली आहे. अॅम्वे ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी आहे. (In money laundering probe, ED attaches assets of Rs 757 crore of Amway India accused of MLM scam)

अधिक वाचा : SBI update | महत्त्वाची बातमी! स्टेट बॅंकेचे होम लोन, कार लोन महागले...ईएमआय वाढणार

काय आहे अॅम्वेची पिरॅमिड स्कीम (Amway pyramid scheme)

ED ने केलेल्या मनी लाँड्रिंगच्या तपासात असे आढळून आले आहे की अॅम्वे ही अमेरिकन मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी, डायरेक्ट सेलिंग मल्टी लेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणूक करत आहे. ईडीला असे आढळून आले की कंपनीने ऑफर केलेल्या बहुतेक उत्पादनांची किंमत त्यांच्या पर्यायांच्या तुलनेत जास्त आहेत.वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ असलेले अनेक लोक कंपनीचे सदस्य म्हणून सामील होण्यासाठी आणि अत्याधिक किंमतीत उत्पादने खरेदी करण्याच्या मोहाला बळी पडतात किंवा प्रवृत्त होतात. यातील गंमतीचा भाग म्हणजे नवीन सभासद स्वतःच्या वापरासाठी अॅम्वेची उत्पादने खरेदी करत नसून कंपनीचा सदस्य बनून श्रीमंत होण्यासाठी खरेदी करत होते. कंपनीने 2002-03 ते 2021-22 या कालावधीत तिच्या व्यवसायातून 27,562 कोटी रुपये गोळा केले. याच कालावधीत अॅम्वेने भारत आणि अमेरिकेतील आपले वितरक आणि सदस्य यांना 7,588 कोटी रुपयांचे कमिशन दिले.

अधिक वाचा : Salary Limit for EPF | पीएफसाठी वाढू शकते पगाराची मर्यादा...15,000 रुपयांवरून 21,000 रु. करण्याचा EPFO कडे प्रस्ताव

कंपनीचे लक्ष उत्पादनांवर नाही

कंपनीचे संपूर्ण लक्ष उत्पादनांवर नसून सदस्य बनून श्रीमंत कसे होऊ शकतात याचा प्रचार करण्यावर आहे. अॅम्वेच्या उत्पादनांचा वापर या मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणजे MLM पिरॅमिड फ्रॉडसाठी थेट विक्री करणारी कंपनी म्हणून केला जातो, असे ईडीला त्यांच्या तपासणीत आढळून आले आहे. अॅम्वेने 1996-97 मध्ये भारतात भागभांडवल म्हणून 21.39 कोटी रुपये आणले आणि 2020-21 या आर्थिक वर्षापर्यंत, 2,859.10 कोटी रुपये लाभांश, रॉयल्टी आणि इतर पेमेंट्सच्या नावाने त्यांच्या गुंतवणूकदारांना आणि मूळ संस्थांना पाठवले.

ब्रिट वर्ल्डवाइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पिरॅमिड योजनेला चालना देण्यात मोठी भूमिका बजावली होती, ज्याद्वारे सदस्यांना साखळी प्रणालीमध्ये नावनोंदणी करून वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली सदस्यांना सामील होण्यासाठी सेमिनार आयोजित केले होते.

अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराई सुरू...सोन्यात आली तेजी, 2363 रुपयांनी वाढली चांदी, करा लगीनघाई

डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना पिरॅमिड योजनांचा प्रचार करण्यास बंदी

दरम्यान, सरकारने डिसेंबर 2021 मध्ये, Tupperware, Amway आणि Oriflame सारख्या थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांना पिरॅमिड आणि मनी सर्कुलेशन योजनांचा प्रचार करण्यावर बंदी घातली होती. कारण सरकारने या उद्योगासाठी नवीन नियम आणले होते. नवीन नियमांमध्ये असे आदेश देण्यात आले आहेत की थेट विक्रेते आणि थेट विक्री करणाऱ्या संस्थांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारांना एक यंत्रणा उभारावी लागेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी