Bank Holidays | पुढील १५ दिवसात ६ दिवस बँका बंद... पाहा यादी आणि करा कामाचे नियोजन

Bank Holiday list : डिजिटल बॅंकिंगमुळे अनेक कामे घरबसल्या होत असली तरी काही बॅंकेच्या काही कामांसाठी बॅंकांच्या शाखेत (Bank) जावेच लागते. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळावे. येत्या १५ दिवसांत बँकेशी संबंधित काही काम असेल तर बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी पाहून त्याचे नियोजन करा. आता महिन्याचे १५ दिवस उलटून गेले, त्यामुळे येत्या १५ दिवसांचे कॅलेंडर बघितले तर ६ दिवस बँका बंद राहणार आहेत.

January Bank Holidays Update
जानेवारी महिन्यातील बॅंकांच्या सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
  • जानेवारी महिन्यात आणखी ६ दिवस बॅंका राहणार बंद
  • आरबीआयनच्या नोटिफिकेशननुसार ठरतात बॅंकांच्या सुट्ट्या
  • जानेवारी महिन्यातील बॅंक हॉलिडेची यादी

January Bank Holidays Update : नवी दिल्ली : बॅंकिंगशी (Banking) निगडीत कामे ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची कामे असतात. डिजिटल बॅंकिंगमुळे अनेक कामे घरबसल्या होत असली तरी काही बॅंकेच्या काही कामांसाठी बॅंकांच्या शाखेत (Bank) जावेच लागते. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळावे. येत्या १५ दिवसांत बँकेशी संबंधित काही काम असेल तर बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी पाहून त्याचे नियोजन करा. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या यादीत जानेवारीच्या सुट्टीतील १६ दिवस बँका बंद राहणार होत्या. आता महिन्याचे १५ दिवस उलटून गेले, त्यामुळे येत्या १५ दिवसांचे कॅलेंडर बघितले तर ६ दिवस बँका बंद राहणार आहेत. (In next 15 days, there are 6 bank holidays, check the list)

आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वे केली जाहीर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा परिस्थितीत बँकांचे काम आटोपण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहून नक्कीच बाहेर पडा, अन्यथा तुमचा दिवस वाया जाईल. शिवाय काम न झाल्यामुळे मनस्तापदेखील होईल आणि तुमचे कोणतेही काम पूर्ण होणार नाही.

दुसरा आणि चौथा शनिवार सुटी

२२ जानेवारीला चौथा शनिवार आणि २३ जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहतील. याशिवाय ३० जानेवारीलाही साप्ताहिक सुट्टी असेल. जर तुम्ही पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल, तर या सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जाण्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामही सहज होईल आणि सुट्टीचीही जाणीव होईल. या कालावधीत ग्राहक एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरू शकतात.

बँका कधी बंद होतील ते जाणून घ्या-

  1. १८ जानेवारी: थाई पूसम (चेन्नई)
  2. २२ जानेवारी: चौथा शनिवार
  3. २३ जानेवारी: रविवार
  4. २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन (देशभर)
  5. ३० जानेवारी: रविवार
  6. ३१ जानेवारी: मी-डॅम-मी-फी (आसाम)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी