October WPI Inflation | घाऊक महागाईचा दणका, ऑक्टोबरमध्ये वाढ होत १२.५४ टक्के

October WPI Inflation Data | घाऊक महागाई ही होलसेल प्राइस इंडेक्सवरून काढली जाते. होलसेल प्राइस इंडेक्स हा घाऊक बाजारातील वस्तूंच्या किंमतीवर आधारित असतो. या किंमती घाऊक बाजारात करण्यात आलेल्या व्यवहारांशी निगडीत असतात. तर किरकोळ महागाई ही कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर अवलंबून असते. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा सर्वसाधारण ग्राहकाने बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमतींवर आधारित असतो.

October Wholesale Inflation
ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईत वाढ 
थोडं पण कामाचं
  • ऑक्टोबर महिन्यात देशातील महागाईत चांगलीच वाढ
  • घाऊक महागाई दर वाढून १२.५४ टक्क्यांवर पोचला
  • इंधन आणि वीज यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे देशातील महागाई वाढली

October WPI Inflation Data | नवी दिल्ली :  ऑक्टोबर महिन्यात देशातील महागाईत (Inflation) वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर (Wholesale Price Index – WPI) वाढून १२.५४ टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई १०.६६ टक्के होती. देशातील इंधनाचे वाढलेले दर (Fuel prices) आणि वीजेचे वाढलेले दर (Electricity rate) याचा परिणाम होत घाऊक महागाईमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. याचबरोबर महागाईत वाढ होण्यासाठी उत्पादित झालेल्या वस्तूंच्या किंमतीमध्ये झालेली वाढदेखील कारणीभूत आहे. (In October Wholesale Price Index rises to 12.54%)

घाऊक किंमत निर्देशांकात वाढ

घाऊक महागाई ही होलसेल प्राइस इंडेक्सवरून काढली जाते. होलसेल प्राइस इंडेक्स हा घाऊक बाजारातील वस्तूंच्या किंमतीवर आधारित असतो. या किंमती घाऊक बाजारात करण्यात आलेल्या व्यवहारांशी निगडीत असतात. तर किरकोळ महागाई ही कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर अवलंबून असते. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा सर्वसाधारण ग्राहकाने बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमतींवर आधारित असतो. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक या दोन्हीमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे.

भाजीपाला, अन्नधान्य, उत्पादित वस्तू महागल्या

सरकारीने दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात घाऊक किंमक निर्देशांकात वाढ होत तो १०.६ टक्क्यांवरून १२.५४ टक्क्यांवर पोचला आहे. याच दरम्यान घाऊक बाजारातील खाण्या पिण्याच्या वस्तूंच्या, अन्नधान्य किंमतीचा महागाई दर १.१४ टक्क्यांनी वाढून तो ३.०६ टक्क्यांपर्यत पोचला आहे. भाजीपाल्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्याचा महागाईदर वाढला आहे. तर उत्पादित वस्तूंच्या किंमतींचा घाऊक महागाई दर ११.४ टक्क्यांवरून वाढून १२.०४ टक्क्यांवर पोचला आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि वीजेचे वाढलेले दर याचा सर्वाधिक फटका घाऊक बाजाराला बसला आहे. 

जाणकारांच्या मते इंधन आणि वीज यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे देशातील महागाई वाढली आहे. अर्थात मागील काही दिवसात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्याने यामध्ये थोडीशी घसरण झाली आहे. त्यामुळे या महिन्यात महागाईदरात घसरण होण्याची अपेक्षा बाळगता येईल.

ऑक्टोबर महिन्यात (October)देशातील किरकोळ महागाईदरात (inflation) वाढ होत तो ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे. अन्नधान्य आणि उत्पादने, मांस, मासे, साखर, खाद्यतेल, अन्न, दारू, पान, गुटखा, कपडे, पादत्राणे इत्यादी श्रेणीतील वस्तूंच्या किंमतीत ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. देशातील किरकोळ किंवा रिटेल महागाई ही कन्झ्युमर प्राइस  इंडेक्स (Consumer Price Index) (CPI)द्वारे मोजली जाते. सीपीआय वाढून ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात कन्झ्युमर प्राइस  इंडेक्स ४.३५ टक्क्यांवर होता. भाजीपाल्याच्या किंमतीत (vegetable prices)झालेल्या मोठ्या वाढीमुळे महागाईदरात एकदम वाढ झाली आहे. सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकडेवारीतून ही बाब दिसते आहे. इंधन, वीज, भाजीपाला, उत्पादित वस्तू, अन्नधान्य यांच्या महागाईने सर्वसामान्य माणसाला मोठा फटका बसतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी