महंगाई डायन मारे जात है! नव्या वर्षात लग्नातून गायब होणार कपड्यांचा आहेर; नवीन कपडे, बूट-चप्पल घेणं महागणार

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 21, 2021 | 15:31 IST

GST hike: केंद्र सरकारने(Central Government) टेक्सटाईल वस्तू (Textile goods) आणि कपड्यावरील जीएसटी (GST) वाढवला आहे, यामुळे बूट-चप्पल (boot slippers) आणि कपडे (Clothes) महागणार आहेत.

 it will be more expensive to buy new clothes, shoes and slippers
GST वाढवल्यानं लग्नातील कपड्यांचा आहेर होणार गायब  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कपड्यांच्या किमतींमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होणार
  • कोणत्याही किमतीच्या कपड्यावर 12 टक्क्याच्या दराने जीएसटी लागणार
  • नवीन दर जानेवारी 2022 पासून लागू केले जाणार आहेत.

GST hike: नवी दिल्ली:  केंद्र सरकारने(Central Government) टेक्सटाईल वस्तू (Textile goods) आणि कपड्यावरील जीएसटी (GST) वाढवला आहे, यामुळे बूट-चप्पल (boot slippers) आणि कपडे (Clothes) महागणार आहेत. या वस्तू घेण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार आहे. सरकार या वस्तूंवरती आधी फक्त 5 टक्के जीएसटी लावत होती. परंतु यात 12 वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर जानेवारी 2022 पासून लागू केले जाणार आहेत. 

CBIT ने दी जानकारी

सेंट्रल  बोर्ड  ऑफ इन डायरेक्ट टॅक्स (CBIT) ने अधिसूचना जारी करत याविषयीची माहिती दिली आहे. दरम्यान बऱ्याच काळापासून शक्यता वर्तवली जात होती की, सरकार रेडीमेड और टेक्सटाईलवरील जीएसटी वाढवू शकते.  

सर्व प्रकारच्या कपड्यावर लागणार 12 टक्क्यांचा जीएसटी 

आता कोणत्याही किमतीच्या कपड्यावर 12 टक्क्याच्या दराने जीएसटी लागणार आहे. आधी एक हजार रुपये किमत असलेल्या कपड्यावरच 5 टक्क्यांची जीएसटी लागत होती. परंतु आता सर्व प्रकारच्या कपड्यावर 12 टक्क्यांची जीएसटी लागणार आहे. 

बूट आणि चप्पलही महागणार

कपड्यांबरोबरच विणलेले धागे, सिंथेटिक धागे, चादरी, तंबू, टेबलवरील कापड, रग्स, टॉवेल्स, हातरुमाल, कालीन, गलीचा आदींवरही 12 टक्क्यांची जीएसटी लागणार आहे. तर पायातील चप्पल आणि बुटांवरील जीएसटीतही वाढ करण्यात आली आहे.

CMAI ने केला विरोध

दरम्यान, क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया(CMAI)ने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. संघटनेच्या मते, देशात महामारीचा प्रभाव अजून कमी झालेला नाही. व्यापारातही तेजी आलेली नाही, त्यात सरकारने जीएसटीचे दर वाढवली आहेत. 

सामान्य नागरिकांवर होणार परिणाम

 सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना आता अधिक खर्चाचा मार सोसावा लागेल. उद्योग जगताला महागाईचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे कच्चा मालाच्या किंमतीसह, विशेषत यार्न, पॅकिग साहित्याच्या किमतीमध्ये तेजी दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात कपड्यांच्या किमतींमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी