Ration Card Rules | या 4 परिस्थितींमध्ये रद्द होईल तुमचे रेशन कार्ड, जाणून घ्या काय आहेत नवे नियम...

Ration Card Scrutiny : तुम्हीही रेशन कार्ड (Ration Card) म्हणजे शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी जरूर वाचा. वास्तविक, कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) संकट काळात सरकारने गरिबांसाठी मोफत रेशनची (Free Ration)व्यवस्था सुरू केली होती. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचा लाभ लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. यामुळे सरकारने पात्र रेशनकार्ड धारकांची छाननी करण्याचे ठरविले आहे.

Ration Card update
रेशन कार्डशी निगडीत नवे नियम 
थोडं पण कामाचं
  • कोरोना महामारीच्या संकटात सरकारकडून गरजूंना मोफत धान्य वाटप
  • मोफत रेशनचा लाभ लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले
  • सरकारकडून होणार रेशन कार्डची छाननी

Ration Card Rules update : नवी दिल्ली : तुम्हीही रेशन कार्ड (Ration Card) म्हणजे शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी जरूर वाचा. वास्तविक, कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) संकट काळात सरकारने गरिबांसाठी मोफत रेशनची (Free Ration)व्यवस्था सुरू केली होती. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचा लाभ लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. यामुळे सरकारने पात्र रेशनकार्ड धारकांची छाननी करण्याचे ठरविले आहे. (In these 4 conditions your Ration Card can be suspended)

अधिक वाचा : LIC IPO | एलआयसीच्या आयपीओसाठी गुंतवणुकदारांची झुंबड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी टाळा 3 चुका आणि करा जबरदस्त कमाई...

कारवाई देखील केली जाऊ शकते

जे अपात्र आहेत अशा लोकांनी स्वतःच त्यांचे रेशनकार्ड रद्द करून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून जनतेला करण्यात येत आहे. शिधापत्रिका रद्द न झाल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.

काय आहे रेशन कार्डाचे नियम

जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला

  1. - 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल
  2. - चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना 
  3. - गावात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न
  4. - शहरात वर्षाला तीन लाखांचे कौटुंबिक उत्पन्न असेल

तर अशा लोकांचे स्वतःचे उत्पन्न असावे, रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

अधिक वाचा : Gold Price Today | स्वस्त झाले सोने... सोडू नका अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ताजा भाव

अपात्रांकडून केली जाणार वसूली

शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड छाननीनंतर रद्द केले जाणार आहेत. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केले जाणार आहे.

अधिक वाचा : IOCL M15 Petrol | महागड्या पेट्रोलपासून लवकरच सुटका होणार? इंडियन ऑइलने सुरू केले स्वस्त इंधन...

रेशन कार्ड आधार लिंक करा

त्याचबरोबर रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बाब आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card)असेल तर तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारच्या वतीने 'वन नेशन वन रेशन कार्ड'वर (One Nation One Ration Card) काम सुरू आहे. याअंतर्गत तुम्हाला कोणत्याही राज्यातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल. यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड (Ration Card) आणि आधार (Aadhaar Card) लिंक करावे लागेल. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक (Ration Card-Aadhaar Link)केले नसेल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. यासाठी आधार आणि रेशन लिंक वेळेत होणे आवश्यक आहे. यापूर्वी सरकारने यासाठी ३१ मार्चपर्यतची मुदत निश्चित केली होती. मात्र आता रेशन कार्ड आधार लिंक करण्याची तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

शिधापत्रिकाधारकांना कमी किमतीत रेशन मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात. केंद्राने 'एक राष्ट्र एक रेशन कार्ड' (One Card One Nation)योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लाखो लोक लाभ घेत आहेत. शिधापत्रिकेशी आधार लिंक करून तुम्ही 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा लाभही घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी