Bank Holidays in April 2022 : नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या बँकेला कोणत्याही तातडीच्या कामासाठी जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही बॅंकांच्या सुट्ट्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण भारतातील बँका या आठवड्यात बंद (Bank Holidays)राहणार आहेत. बॅंकांच्या सुट्ट्या हा सर्वसामान्य माणसासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. डिजिटल बॅंकिंगमुळे अनेक कामे घरबसल्या होत असली तरी काही बॅंकेच्या काही कामांसाठी बॅंकांच्या शाखेत (Bank) जावेच लागते. या आठवड्यात बॅंका 4 दिवस बंद राहतील. विविध भागातील विविध शहरात कोणत्या दिवशी बॅंकांना सुट्टी असणार ते जाणून घेऊया. (In this week of April, Banks to remain closed for 4 days, Check the list)
अधिक वाचा : SBI cash withdrawal | स्टेट बॅंकेच्या एटीएएममधून ओटीपी-आधारित पैसे कसे काढाल...पाहा पैसे काढायची सोपी पद्धत
भारतातील बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार आहेत, हे ग्राहकांनी जाणून घेतले पाहिजे. परिणामी, जाण्यापूर्वी तुमची बँकेला त्या विशिष्ट दिवशी सुट्टी तर नाही ना हे तपासा. 14 एप्रिलपूर्वी सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण 14 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत सर्व बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दरवर्षी भारतातील सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकांसाठी बँक सुट्ट्यांची यादी प्रकाशित करते. 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत सुट्टी,' 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत सुट्टी आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे,' आणि 'बँक' खाते बंद करणे' या सुट्ट्यांचा यात समावेश आहे. विविध ठिकाणी विविध उत्सवांमुळे एप्रिल महिन्यात बॅंकांना एकूण 15 सुट्ट्या आहेत.
अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराईत मोठी संधी...सोन्याची झळाळी आणि चांदीची चमक घटली...पाहा ताजा भाव
अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल