Income Tax Relaxation: सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या तुम्हाला किती होणार फायदा

काम-धंदा
Updated Feb 01, 2020 | 14:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Income Tax: या दशकातील पहिल्या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. या बजेटमध्ये मध्यम वर्गीय करधारकांना उत्पन्नावरील टॅक्स कमी करण्यात आलाय. जाणून घ्या नवीन बदल...

Tax
सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा, पाहा तुम्हाला किती फायदा   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा
  • टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही, पण टॅक्समध्ये कपात
  • बँक खातेधारकांसाठीही दिलासा देणारी अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली: २०२०-२१ सालचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलाय. या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाला नसला तरी टॅक्समध्ये कपात करण्यात आलीय. या कपातीमुळे सर्व करधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२.५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही

यावेळी बजेट स्लॅबमध्ये बदल झाला नाहीय. या वर्षात सुद्धा २.५ लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना कुठलाही टॅक्स लागणार नाहीय.

२.५ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर

मात्र २.५ ते ५ लाखांपर्यंतं उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळालाय. आता या उत्पन्न गटातील करधारकांना फक्त ५ टक्के कर भरावा लागणार आहे.

५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर  १० टक्के कर

तर ५ ते ७.५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता अवघे १० टक्के टॅक्स भरावा लागेल. हा दर गेल्यावर्षी २० टक्के होता. त्यामुळे या उत्पन्न गटातील नोकरदारांना सुद्धा मोठा दिलासा अर्थमंत्र्यांनी दिलाय.

७.५० ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर

त्याचप्रमाणे ७.५० ते १० लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता १५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे.

१० ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर

१० लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना चांगलाच दिलासा मिळालाय. यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी १० ते १२ लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना आता अवघे २० टक्के कर भरावा लागणार आहे. यापूर्वी हा आकडा ३० टक्के इतका होता.

१२ लाख ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर

तर १२ ते १५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना आता २५ टक्के कर भरावा लागेल. पूर्वी हा आकडा ३० टक्के होता. त्यामुळे १२ ते १५ लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या गटालासुद्धा दिलासा मिळालाय.

१५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ३० टक्के कर

तर बजेट २०२०-२१ मध्ये अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांनी १५ लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागेल हे जाहीर केलंय.

२०१९-२० च्या अर्थसंकल्पात कसा होता टॅक्स स्लॅब –

गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र आयकरशी संबंधिक नियमांमध्ये बदलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावेळी बजेटमध्ये आयकरशी संबंधित ६८ संशोधन प्रस्तावित होते. सरकारनं होम लोन मध्ये सूट, इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील खरेदीवर सूट देण्यात आली होती.

करदात्यांना कुठलाही त्रास होणार नाही: निर्मला सीतारामन

दरम्यान टॅक्सबद्दल बोलतांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटलं, करदाते कोणत्याही प्रकारच्या कर-जाचापासून मुक्त राहतील, याची हमी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर कायद्यामध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर असल्याचंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

बँक खातेधारकांना दिलासा देणारी घोषणा

बँकेच्या खातेधारकांना दिलासा देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. त्या म्हणाल्या, एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा त्यात काही घोटाळा झाला तरी खातेदाराच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतील.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी