How to find out old tax regime vs nex tax regime which is suitable for you: नुकत्याच सादर करण्यात आलेल्या बजेट 2023 मध्ये अर्थ मंत्रालयाने टॅक्स व्यवस्थेत काही बदल केले आहेत. या बजेटमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले आहे. नवी कर प्रणाली डिफॉल्ट ठेवण्यात आली आहे तर जुनी कर प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरू ठेवली आहे. अशा स्थितीत नवी आणि जुनी कर प्रणाली यापैकी कोणती तुमच्यासाठी योग्य आहे? हे जाणून घेण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स कॅलक्युलेटर उपलब्ध करुन दिलं आहे.
इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स कॅलक्युलेटर लाईव्ह उपलब्ध करुन दिलं आहे. इन्कम टॅक्स विभागाने ट्विट करत सांगितले की, टॅक्स कॅलक्युलेटर करदात्यांच्या सुविधेसाठी लाईव्ह उपलब्ध करुन दिलं आहे. याच्या माध्यमातून करदाता आपल्या वार्षिक उत्पन्नानुसार, जुनी आणि नवी कर प्रणालीनुसार टॅक्स कॅलक्युलेशन करु शकतील.
Tax Calculator is now live! — Income Tax India (@IncomeTaxIndia) February 20, 2023
A dedicated tax calculator to check Old Tax Regime vis-à-vis New Tax Regime for Individual/HUF/AOP/BOI/Artificial Juridical Person(AJP) as per Section 115BAC can now be accessed on the IT Dept website.
Pl check the link below:https://t.co/dy04iY4oj5 pic.twitter.com/JF4VfmXQw4
हे पण वाचा : कमी तेलात अशी बनवा कुरकुरीत भजी
टॅक्स कॅलक्युलेटरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
यानंतर डाव्या बाजूला देण्यात आलेल्या क्विक लिंक्स (Quick Links) अंतर्गत येणाऱ्या लिस्टमधील पाचव्या लिंकवर म्हणजेच Income Tax Calculator या टॅबवर क्लिक करावे लागेल.
Income Tax Calculator या टॅबवर क्लिक करताच नवे पेज ओपन होईल.
या पेजवर विचारण्यात आलेली माहिती भरा. यानंतर तुम्ही नवीन आणि जुन्या टॅक्स व्यवस्थेनुसार टॅक्स कॅलक्युलेट करु शकता.
इन्कम टॅक्स कॅलक्युलेटरचा वापर करण्यासाठी तुम्ही https://incometaxindia.gov.in/Pages/tools/115bac-tax-calculator-finance-bill-2023.aspx या थेट लिंकवर सुद्धा जावू शकता.
हे पण वाचा : सासरवाडीत वापरा या टिप्स, सासू झटक्यात होईल इम्प्रेस