ITR Filing: करदात्यांना पाठवलेल्या कडक भाषेतील मेसेजवरील टीकेनंतर, बदलला प्राप्तिकर विभागाचा सूर

Income Tax : प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Department) करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये विभागाची भाषा बदललेली दिसते. प्राप्तिकर विभाग आता करदात्यांना पाठवत असलेल्या संदेशात करदात्यांना विलंब शुल्क भरू नये म्हणून 31 जुलै 2022 पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तुम्हीदेखील प्राप्तिकर विवरणपत्र अद्याप भरले नसेल तर लगेच ते भरा.

ITR Filing
प्राप्तिकर विवरणपत्र  
थोडं पण कामाचं
  • प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022
  • प्राप्तिकर विभागावर टीका झाल्यावर बदलला सूर
  • विभागाकडून आधी पाठवल्या जाणाऱ्या धमकीवजा मेसेजची भाषा बदलली

ITR Filing : नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Department) करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये विभागाची भाषा बदललेली दिसते. प्राप्तिकर विभाग आता करदात्यांना पाठवत असलेल्या संदेशात करदात्यांना विलंब शुल्क भरू नये म्हणून 31 जुलै 2022 पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तुम्हीदेखील प्राप्तिकर विवरणपत्र अद्याप भरले नसेल तर लगेच ते भरा. कारण आता मुदत संपण्यास दोनच दिवस बाकी आहेत.(Income tax department changes the tone after criticism)

अधिक वाचा : दोन गटात तुफान हाणामारी, पहा व्हिडीओ

विभागाचा टोन बदलला

खरं तर, गेल्या आठवड्यातच, प्राप्तिकर विभागाच्या धमकीच्या भाषेतील एसएमएसबद्दल चर्चा झाली होती. त्यानंतर  प्राप्तिकर विभागावर सोशल मीडियावर जोरदारपणे टीका झाली होती. अनेक करदात्यांना मिळालेल्या पूर्वीच्या संदेशांमध्ये असे लिहिले होते की "प्रिय (पॅन क्रमांक) परिणाम टाळण्यासाठी 31 जुलै 2022 पूर्वी www.incometax.gov.in वर 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न फाइल करण्यास विसरू नका." परंतु आता करदात्यांना पाठविण्यात आलेल्या संदेशात प्राप्तिकर विभाग म्हणतो आहे की प्रिय (पॅन क्रमांक) प्राप्तिकर विलंब शुल्क भरू नये म्हणून 31 जुलै 2022 पूर्वी www.incometax.gov.in वर 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास विसरू नका.

अधिक वाचा : Facebook : फेसबुकमुळे वैतागले अख्खं गाव, ४० ते ५० महिलांनी दिली पोलिसात तक्रार

31 जुलै ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 

वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्ष  आणि 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवून मुदतीची सतत आठवण करून देत आहे.

करदाते कसे वाढतील?

एकीकडे प्राप्तिकर विभाग अधिकाधिक लोकांना कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकाधिक लोकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. प्राप्तिकराचा भरणा राष्ट्र उभारणीशी जोडला गेला आहे. अशा परिस्थितीत, कर विभागाच्या अशा धमकीच्या टोनसह एसएमएस करदात्यांना चुकीचा संदेश देऊ शकतात. मात्र, या वृत्ताची दखल घेत प्राप्तिकर विभागाने तात्काळ आपली भाषा बदलली आहे.

अधिक वाचा : Shocking Incident : कामठी, नागपूर येथे अंत्यसंस्कार करताना डिझेलला आग, 2 ठार, 1 जखमी

महसूल सचिव तरुण बजाज यांनी केंद्र सरकार प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढविण्याचा विचार करत नसल्याचे सांगितल्यानंतर, हे जवळजवळ निश्चित झाले आहे की आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. ही अंतिम मुदत वैयक्तिक करदात्यांना लागू आहे. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे हा अत्यावश्यक दस्तावेज आहेत मात्र त्याचबरोबर कर नियोजन (Tax Planning) करणे हा आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, उशीरा आयटीआर दाखल केल्यास 5,000 रुपयांपर्यंत उशीरा फाइलिंग शुल्क लागू केले जाते. तथापि, लहान करदात्यांना, जर उत्पन्न 5 लाख रुपयांच्या पुढे जात नसेल तर विलंब भरण्याचे शुल्क 1,000 रुपये आहे. 

सर्वात मूलभूत - ITR-1 किंवा सहज - करदात्यांच्या पगारदार वर्गाने भरले पाहिजे. फॉर्ममध्ये स्वतंत्र क्षेत्रामध्ये करनिर्धारणाचे तपशील मागवले जातात. यात सूट नसलेले भत्ते, पगाराच्या बदल्यात नफा आणि इतरांमधील पूर्व शर्तीचे मूल्य यांचा समावेश असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी