Anil Ambani News: अनिल अंबानी यांनी दिवाळखोर झाल्याचे केले होते घोषित...आता 800 कोटींच्या अघोषित परदेशी संपत्तीसाठी नोटीस!

Anil Ambani Wealth : कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani)यांच्यासमोर संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन युनिटने (Income Tax Investigation Unit) मार्च 2022 मध्ये अनिल अंबानींविरुद्ध अंतिम आदेश जारी केला. काळा पैसा कायदा 2015 (Black Money Act)अंतर्गत परदेशात अघोषित मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या आरोपांवरून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Anil Ambani Foreign Assets
अनिल अंबानींची परदेशातील संपत्ती 
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन युनिटने मार्च 2022 मध्ये अनिल अंबानींविरुद्ध अंतिम आदेश जारी केला.
  • 2019 मध्ये देखील काळा पैसा कायद्याअंतर्गत परदेशात अघोषित संपत्तीसाठी नोटीस जारी करण्यात आली होती.
  • फेब्रुवारी 2020 मध्ये अनिल अंबानी यांनी ब्रिटनच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले.

Anil Ambani Latest News: मुंबई : कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani)यांच्यासमोर संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन युनिटने (Income Tax Investigation Unit) मार्च 2022 मध्ये अनिल अंबानींविरुद्ध अंतिम आदेश जारी केला. काळा पैसा कायदा 2015 (Black Money  Act)अंतर्गत परदेशात अघोषित मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या आरोपांवरून हा आदेश जारी करण्यात आला आहे. अनिल अंबानी यांना यापूर्वी 2019 मध्ये काळा पैसा कायद्यांतर्गत परदेशात अघोषित संपत्तीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. (Income Tax department investigation unit notice to Anil Ambani)

अधिक वाचा : Elon Musk Latest : इलॉन मस्कचा ट्विटरबरोबरचा सौदा रद्द? ट्विटरने माहिती लपवल्याचा मस्कचा आरोप...

काय आहे प्रकरण

इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन युनिटच्या ऑर्डरमध्ये परदेशी मालमत्ता आणि त्यांच्याशी जोडलेल्या बँक खात्यांमधील व्यवहारांची संपूर्ण यादी आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सध्याच्या रुपया-डॉलर विनिमय दरानुसार या व्यवहारांचे एकूण मूल्य सुमारे 800 कोटी रुपये आहे. अनिल अंबानी यांना काही प्रश्न पाठवण्यात आले होते, ज्यांचे त्यांनी उत्तर दिले नाही. फेब्रुवारी 2020 मध्ये, अनिल अंबानी यांनी ब्रिटनच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले आणि सांगितले की त्यांची एकूण संपत्ती शून्य आहे.

अधिक वाचा : World's Richest Person : गौतम अदानींची घोडदौड, आता जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, तर मुकेश अंबानी घसरले 11व्या स्थानी

अनिल अंबानींची परदेशातील संपत्ती

ब्लॅक मनी अॅक्टच्या आदेशानुसार अनिल अंबानी यांच्या बहामा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये काही मालमत्ता आहेत. बहामासमध्ये त्यांनी ड्रीमवर्क्स होल्डिंग्स इंक अंतर्गत 2006 मध्ये डायमंड ट्रस्टची स्थापना केली. सीबीडीटीने विदेशी कर आणि कर संशोधन विभागामार्फत बहामास येथे संपर्क साधाल तेव्हा कंपनीचे UBS बँकेच्या (स्विस बँक) झुरिच शाखेशी असलेले संबंध उघड झाले.

अधिक वाचा : RBI On Currency Notes: नोटांवर राहणार महात्मा गांधींचा फोटो, फोटो बदलणार नसल्याचे आरबीआयने दिले स्पष्टीकरण

अंबानी कुटुंबिय एकमेकांच्या साथीला

अनिल-मुकेश अंबानी हे भाऊ संकटसमयी एकत्र असल्याचे चित्र दिसते आहे. मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानींना कधी तुरुंगात जाण्यापासून वाचवले, कधी व्यवसाय बुडण्यापासून वाचवले आहे. मुकेश अंबानींच्या घरच्या कार्यात अनिल अंबानी उत्साहाने सहभागी होताना दिसले आहेत. आई कोकिलाबेन यांच्यामुळे दोन्ही भावांची नाळ एकत्र बांधली गेल्याचे चित्र आहे. मुकेश अंबानींच्या लेकीच्या लग्नाच्या वेळेसदेखील अनिल अंबानी काकाचे कर्तव्य बजावताना दिसत होते.

अनिल अंबानींची परदेशातील कंपनी

समोर आलेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये अनिल अंबानी यांनी आणखी एक अघोषित परदेशी कंपनी स्थापन केली होती. नॉर्थ अटलांटिक ट्रेडिंग लिमिटेड असे त्याचे नाव सांगितले जात आहे. या कंपनीचे बँक ऑफ सायप्रसमध्ये खाते सापडले आहे. ही कंपनी नुकत्याच समोर आलेल्या Pandora Papers मध्ये समाविष्ट केलेल्या 18 कंपन्यांपैकी एक आहे. 2015 मध्ये स्विस लीक्सच्या तपासानंतर, हे उघड झाले की अनिल अंबानी हे 1100 भारतीयांपैकी एक होते ज्यांचे एचएसबीसीच्या जिनिव्हा शाखेत खाते आहे. 2006-07 मध्ये, त्यांच्याकडे या बँक खात्यात 2.66 कोटी डॉलर शिल्लक होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी