इन्कम टॅक्स रिटर्न भरणे झाले आणखी सोपे, हे आहे नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य

Income Tax department launches new offline utility केंद्र सरकारने आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४ ऑफलाइन भरण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे.

Income Tax department launches new offline utility
इन्कम टॅक्स रिटर्न भरणे झाले आणखी सोपे 

थोडं पण कामाचं

  • इन्कम टॅक्स रिटर्न भरणे झाले आणखी सोपे
  • आयटीआर फॉर्म-१ (सहज) आणि आयटीआर फॉर्म-४ (सुगम) ऑफलाइन भरता येणार
  • सोयीनुसार इ-फायलिंग पोर्टलवर अपलोड करता येणार

नवी दिल्ली: इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणे आता आणखी सोपे झाले आहे. केंद्र सरकारने आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४ ऑफलाइन भरण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. हा पर्याय निवडू इच्छिणाऱ्यांना आयटीआर फॉर्म-१ किंवा आयटीआर फॉर्म-४ इ-फायलिंग पोर्टल येथून डाऊनलोड करुन ऑफलाइन भरता येईल. Income Tax department launches new offline utility

आपल्या संगणकात विंडोज सेव्हन ऑपरेटिंग स्टिस्टिम अथवा त्यानंतरची आवृत्ती असेल तर आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४ डाऊनलोड करणे शक्य आहे. सध्या आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४ हे दोनच फॉर्म ऑफलाइन उपलब्ध आहेत. ज्यांना आयटीआर फॉर्म-१ (सहज) किंवा आयटीआर फॉर्म-४ (सुगम) यापैकी एक फॉर्म भरुन इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करायचे आहे त्यांनाच ऑफलाइनचा पर्याय उपलब्ध आहे. ऑफलाइन पर्याय म्हणजे करदाता त्याचा पूर्ण फॉर्म भरुन ठेवू शकतो आणि त्याच्या सोयीनुसार इ-फायलिंग पोर्टलवर अपलोड करू शकतो. 

प्रामुख्याने वैयक्तिक, हिंदू अविभावजित कुटुंबातील सदस्य तसेच ५० लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कंपन्या आयटीआर फॉर्म-१ (सहज) किंवा आयटीआर फॉर्म-४ (सुगम) भरतात. या सर्वांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे शक्य आहे. 

इ-फायलिंग पोर्टलवर करदात्यांना वारंवार पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एफएक्यू अर्थात वारंवार विचारले जाणारे प्रश्न Frequently Asked Questions (FAQ)  अशा स्वरुपाचा एक विभाग आहे. याद्वारे करदात्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. ही प्रश्नोत्तरे वाचून करदाते कोणत्याही अडचणीशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात प्राप्तीकर विवरणपत्र (आयटीआर) भरू शकतात. 

करदात्याने त्याचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे काम लवकर होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीनुसार फॉर्मसोबत जोडायच्या कागदपत्रांमध्ये तफावत असू शकते. 

आयटीआर फॉर्म-१ (सहज) आणि आयटीआर फॉर्म-४ (सुगम) भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात प्रामुख्याने मध्यमवर्गीय आहेत. याच कारणामुळे आयटीआर फॉर्म-१ (सहज) आणि आयटीआर फॉर्म-४ (सुगम) संदर्भातला निर्णय हजारो करदात्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे. 

प्रसिद्ध झाले नवे फॉर्म

आयकर विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याकरिता आयटीआर फॉर्म-१ (सहज), आयटीआर फॉर्म-२, आयटीआर फॉर्म-३, आयटीआर फॉर्म-४ (सुगम), आयटीआर फॉर्म-५, आयटीआर फॉर्म-६, आयटीआर फॉर्म-७ आणि आयटीआर फॉर्म-V हे नवे फॉर्म प्रसिद्ध केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी