Income Tax भरल्यानंतरदेखील नोटिस आली तर घाबरू नका...लगेच करा हे काम

Income Tax Notice | प्राप्तिकर विभागाकडून एखादी नोटिस आली तर घाबरू नका. इंटिमेशन ही प्राप्तिकर विभागाकडून पाठवण्यात आलेली नोटिस असते. सेक्शन १४३ (१)अंतर्गत इंटिमेशनचा अर्थ आणि त्याची कक्षा वेगळी आहे. इंटिमेशन नोटिसद्वारे हे कळते की आयटीआर योग्य आहे की चुकीचा आहे. तुमच्याकडून चुकीचे प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरले गेल्यास तुम्हाला नोटिस येऊ शकते.

Income Tax Notice
इन्कम टॅक्स नोटिस 
थोडं पण कामाचं
  • प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स फाइल(ITR filing) प्राप्तिकर विभागाकडून प्रोसेस केले जाते
  • इन्कम टॅक्स अॅक्स १९६१ च्या सेक्शन १४३ (१) अंतर्गत करदात्यांना जी नोटिस पाठवली जाते त्याला इंटिमेशन नोटिस म्हणतात
  • तुम्हाला इंटिमेशन नोटिस आल्यास घाबरू नका, यात ती कशाबद्दल आली आहे तेदेखील सांगितले जाते

Income Tax Notice | नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरदार (Salaried person) असाल तर तुम्ही नक्कीच प्राप्तिकर (Income Tax) भरत असाल. शिवाय प्राप्तिकर विवरणपत्रदेखील (ITR)दाखल करत असाल. तुम्ही जे प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स फाइल(ITR filing) करता ते प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax department)प्रोसेस केले जाते. अशात जर तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून एखादी नोटिस (Income Tax Notice) आली तर घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे करण्याचे कारण नाही. कारण इन्कम टॅक्स अॅक्स १९६१ च्या सेक्शन १४३ (१) अंतर्गत करदात्यांना जी नोटिस पाठवली जाते त्याला इंटिमेशन नोटिस (Intimation Notice) म्हटले जाते. जर तुम्हाला असेच इंटिमेशन आले असेल तर घाबरण्याचे कारण नाही. (If you get Intimation from Income Tax department, don't panic, do this)

इंटिमेशन काय असते ?

कारण इंटिमेशन द्वारे तुम्हाला हे सांगितले जाते की तुम्ही जी माहिती दिली आहे ती काय आहे आणि प्राप्तिकर विभागाकडे जी माहिती आहे त्यामध्ये काय आहे. शिवाय जर दोन्ही माहितीमध्ये काहीही वेगळे आढळले तर तुम्हाला तसे कळवले जाते. इंटिमेशन ही प्राप्तिकर विभागाकडून पाठवण्यात आलेली नोटिस असते. सेक्शन १४३ (१)अंतर्गत इंटिमेशनचा अर्थ आणि त्याची कक्षा वेगळी आहे. इंटिमेशन नोटिसद्वारे हे कळते की आयटीआर योग्य आहे की चुकीचा आहे. तुमच्याकडून चुकीचे प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरले गेल्यास तुम्हाला नोटिस येऊ शकते.

प्राप्तिकर विभागाकडून इंटिमेशनचा फॉर्मेट बदलून पूर्णपणे सोपा करण्यात आला आहे. कारण या इंटिमेशनच्या सुरूवातीलाच लिहून सांगितले जाते की यात तुम्हाला कशाबद्दल माहिती देण्यात येणार आहे किंवा कशाबद्दल सांगितले जाणार आहे. म्हणजेच जर तुम्हाला इंटिमेशन आले तर घाबरण्याचे कारण नाही. कारण तुम्हाला त्यात सुरूवातीलाच ही माहिती देण्यात आली असेल की हे इंटिमेशन किंवा नोटिस कशासाठी पाठवण्यात आले आहे.

कोणत्या कारणास्तव येऊ शकते नोटिस-

  1. नो डिमांड-नो रिफंड - म्हणजे जे प्राप्तिकर विवरणपत्र किंवा आयटीआर भरले आहे त्यात प्राप्तिकर विभागाला स्वीकारल आहे आणि यामध्ये कोणत्याही डिमांड आणि रिफंड नसण्याची बाब सांगितली जाते.
  2. जर तुमच्याकडून रिफंड क्लेम केल्यावर प्राप्तिकर विभागाने याला स्वीकारले आणि पुढे प्रोसेस केले तर त्या परिस्थितीत तुम्हाला ही नोटिस येऊ शकते.
  3. याशिवाय जर तुमच्याकडून रिफंड भरण्यात आला आहे, मात्र प्राप्तिकर विभागाकडून याला चुकीचे ठरवण्यात येऊन यामध्ये डिमांडचा उल्लेख केला असेल. तर अशा परिस्थितीत नोटिस येऊ शकते.

इंटिमेशन किंवा नोटिस आल्यानंतर काय करावे ?

जर तुमचे नो डिमांड-नो रिफंड असेल तर जे रिफंडसाठी तुम्ही भरले आहे ते एकदम बरोबर असल्यास तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. त्या परिस्थितीत ही फक्त तुम्हाला माहिती देण्याकरिता नोटिस आहे की तुमच्याकडून भरण्यात आलेले नो डिमांड-नो रिफंड प्राप्तिकर विभागाकडून स्वीकारण्यात आले आहे. तुमच्या बॅंक खात्यात आपोआप रिफंड जमा होईल. मात्र जर नोटिसमध्ये तुमची डिमांड आली असेल आणि तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. असे केल्यास ही नोटिस आपोआप रद्द होईल. मात्र जर तुमच्याकडून कोणतीही चूक झालेली नसेल आणि तरीदेखील डिमांड आली असेल तर तुम्ही यासाठी रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट दाखल करू शकता.

  1. योग्य प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे आयटीआर भरल्यास रिफंड सहजपणे मिळतो.
  2. डिमांड आल्यावर कर भरावा लागतो.
     
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी