नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये असंख्य अडचणी, निर्मला सीतारामन यांचा इन्फोसिसच्या नंदन निलेकणींवर निशाणा

नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये करदात्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस आणि कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्यावर निशाणा

Nirmala Sitaraman tags Infosys and its co-founder Nandan Nilekani
नव्या ई-फायलिंग पोर्टलवरून सीतारामन यांनी टोलने निलेकणींचे कान 

थोडं पण कामाचं

  • निर्मला सीतारामन यांनी टोचले निलेकणींचे कान
  • नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये असंख्य तांत्रिक अडचणी
  • नागरिकांनी सोशल मीडियावर मांडल्या तक्रारी

नवी दिल्ली : नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये करदात्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी आज देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस (Infosys)आणि कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलेकणी (Infosys co-founder Nandan Nilekani) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी ट्विट ( Nirmala Sitaraman Tweet)करत नंदन निलेकणींना करदात्यांना चांगली सेवा पुरवणे हे प्राधान्याचे आहे, असे म्हटले आहे. कालच म्हणजे ७ जून २०२१ला प्राप्तिकर विभागाचे नवी ई-फायलिंग पोर्टल (e-filing portal 2.0) लॉंच झाले होते. या नव्या ई-फायलिंग पोर्टलमुळे सर्वसामान्य करदात्यांना सहजरित्या प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येईल असे प्राप्तिकर विभागाचे (Income tax department) आणि अर्थमंत्रालयाचे म्हणणे होते. मात्र प्रत्यक्षात आज नव्या ई-फायलिंग पोर्टलवर सर्वसामान्य करदात्यांना असंख्य अडचणींना (Glitches On New Tax Site) तोंड द्यावे लागले. अर्थमंत्रालय आणि प्राप्तिकर विभागाकडे यासंदर्भातील अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी ट्विट करत नंदन निलेंकणींवर निशाणा साधला. (Nirmala Sitaraman tags Infosys and its co-founder Nandan Nilekani over several Glitches on e-filing portal 2.0)

निर्मला सीतारामन यांनी टोचले निलेकणींचे कान

आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, 'अनेक दिवसांपासून वाट पाहण्यात येत असलेले ई-फायलिंग पोर्टल २.० काल रात्री ८:४५ वाजता लॉंच झाले. त्यात अनेक अडचणी आणि चुका आढळून येत आहेत. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी करदात्यांना चांगली सेवा पुरवण्यात कमी पडणार नाहीत अशी आशा आहे. करदात्यांची तक्रार निवारण करणे याला आमचे प्राधान्य असेल,' 
प्राप्तिकर विभागाची बऱ्याच काळापासून वापरात असलेल्या जुन्या वेबसाईटच्या या http://incometaxindiaefiling.gov.in युआरएलच्या जागी नव्या ई-फायलिंग पोर्टलची URL http://incometax.gov.in ही युआरएल उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ती रात्री ८:४५ वाजेपासून कार्यान्वित झाली आहे, असे ट्विट काल निर्मला सीतारामन आणि प्राप्तिकर विभागाने केले होते.

नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये अडचणी

काल लॉंच झाल्याबरोबर प्राप्तिकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलचा लगेचच करदात्यांनी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास सुरूवात केली. त्यामुळे ग्राहकांना किंवा करदात्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. काही युजर्सनी या नव्या ई-फायलिंग पोर्टलच्या नव्या सुविधांचे कौतुक केले तर काही युजर्सनी मात्र जुन्या वेबसाईटच्या तुलनेत नवे ई-फायलिंग पोर्टल अधिक वेळखाऊ असल्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.

नवे ई-फायलिंग पोर्टल ७ जून २०२१ पासून सुरू होण्याची घोषणा याआधीच प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आली होती. नवे ई-फायलिंग पोर्टलबरोबर नव्या मोबाईल अॅपदेखील (Mobile App for ITR) करदात्यांसाठी उपलब्ध होणार आहे. याआधीच्या आर्थिक वर्षांमध्ये भरलेल्या प्राप्तिकर विवरणपत्र (ITR filing),आयटीआर फॉर्म आणि सरल इन्कम टॅक्सशी संबंधित सुविधा या नव्या ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत. 

जेव्हा नागरिकांचा संयम सुटला

प्राप्तिकर विभागाचे नवे ई-फायलिंग पोर्टल सोमवारी (७ जून) रात्री सुरू करण्यात आले. अनेक नागरिक याची प्रतिक्षा करत होते. कारण प्राप्तिकर विभागाने १ जून २०२१ ते ६ जून २०२१ या दरम्यान वेबसाईट बंद ठेवली होती. ७ जून पासून नवे ई-फायलिंग पोर्टल लॉंच होणार होते. अनेक नागरिकांना असे वाटत होते की ७ जूनला सकाळपासूनच नवे ई-फायलिंग पोर्टल कामकाजासाठी उपलब्ध होईल. मात्र असे झाले नाही. जेव्हा रात्री नवे पोर्टल लॉंच झाले तेव्हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या वेबसाईटचा वापर सुरू केला. अर्थात त्यांना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले आणि ट्विटरसह सोशल मीडियावर नव्या ई-फायलिंग पोर्टलच्या तक्रारींची रीघ लागली.

ई-फायलिंग पोर्टल २.० मधील सर्वात महत्त्वाच्या सुविधा-

  1. या नव्या ई-फायलिंग पोर्टलवरील ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा : नव्या पोर्टलवर आयटीआर १, ४ (ऑनलाईन आणि ऑफलाईन) आणि आयटीआर २ (ऑफलाईन) संदर्भात करदात्यांच्या मदतीसाठी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. आयटीआर ३, ५, ६, ७ तयार करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
  2. नवा डॅशबोर्ड : नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये नवा एकच डॅशबोर्ड असणार आहे. या एकाच डॅशबोर्डवर सर्व प्रकारचे पर्याय, अपलोड आणि प्रलंबित प्रक्रिया करदात्यांना उपलब्ध होतील.
  3. मोबाईल अॅप : नवे ई-फायलिंग पोर्टल किंवा वेबसाईट लॉंच केल्यानंतर त्यासाठीचे नवे मोबाईल अॅपदेखील लॉंच करण्यात येणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामकाजाची सुविधा मोबाईलवरदेखील उपलब्ध होणार आहे.
  4. हाताळण्यास सोपे आयटीआर बनवणारे सॉफ्टवेअर : नवे पोर्टल  करदात्यांना मोफत ऑफलाईन आणि ऑनलाईन आयटीआर बनवून देणारे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार आहे. हाताळण्यास अत्यंत सुलभ अशा या सॉफ्टवेअरमुळे प्राप्तिकर विवरणपत्र जमा करण्याची प्रक्रिया वेगवान आणि सुलभ होणार आहे.
  5. करदात्यांच्या शंकांचे होणार निरसन : करदात्यांच्या मदतीसाठी  नव्या पोर्टलमध्ये चॅटबोट, लाईव्ह एजन्ट आणि टुटोरियल : करदात्यांच्या किंवा ग्राहकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, त्यांचे शंका निरसन करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवर टुटोरियल्स असणार आहेत, यामध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याविषयीचे मार्गदर्शन असेल आणि संबंधित व्हिडिओदेखील असणार आहेत. 

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२१ ही आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी