IT Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी यंदा मुदतवाढ मिळणार नाही?

काम-धंदा
Updated Jul 11, 2019 | 16:54 IST | टाइम्स नाऊ हिंदी

IT Return: पगारदार आणि इतरांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुढे ढकलण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैच्या आतच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सल्ला कन्सल्टंट देत आहेत.

IT Return
३१ जुलैपूर्वीच भरा इन्कम टॅक्स रिटर्न   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • इन्कम टॅक्स रिटर्नची डेडलाईन ३१ जुलैपर्यंत राहणार?
  • मुदतवाढ देण्याचा अद्याप कोणताही विचार नाही
  • अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे लोकसभेत स्पष्टीकरण

नवी दिल्ली : दर वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी प्राप्तिकर विभाग पहिल्यांदा ३१ जुलैची अंतिम तारीख जाहीर करतं. त्यानंतर ही मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात येते. यंदा तुम्ही जर याच भ्रमात असाल तर ते डोक्यातून काढून टाका. कारण, सरकारने लोकसभेत या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून, लोकांकडून मागणी झाली असली तरी, अजून तरी पगारदार आणि इतरांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुढे ढकलण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैच्या आतच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तयारी करून ठेवा, असा सल्ला टॅक्स कन्सल्टंट देत आहेत.

फॉर्म रिटर्नमध्ये झाले बदल

या संदर्भात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, जास्तीत जास्त डिक्लोजर (प्रकटीकरण) होण्यासाठी सरकारने फॉर्म १६ आणि फॉर्म २४मध्ये बदल केले आहेत. आधीच टॅक्स भरलेल्या पगारदार नोकरदारांसाठी १२ एप्रिलला सरकारने एक नोटिफिकेशन दिले होते. त्यात टॅक्स रिटर्न फॉर्म संदर्भात बदल करण्यात आले होते. त्यात जादा माहिती जोडण्यात आली होती. फॉर्म १६ मध्ये जे बदल करण्यात आले आहेत. त्यात सेक्शन १० अंतर्गत येणाऱ्या अनेक प्रकारच्या अलाऊन्सेसची माहिती क्लासनुसार द्यावी लागणार आहे. तसेच स्टँडर्ड डिडक्शनची रक्कमही सांगावी लागणार आहे. त्याशिवाय सेक्शन ८७ ए अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटची माहितीही द्यावी लागेल. ठाकूर यांनी केलेल्या दाव्यानुसार हे बदल सहजतेसाठी करण्यात आले आहेत. तसेच नियमांचेही ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे. या वेळी कर दात्यांना होणाऱ्या समस्यांचा विचार करून फॉर्म १६ जाहीर करण्याची तारीख १५ जूनपासून वाढवून १० जुलै करण्यात आली आहे. कंपन्यांच्या फॉर्म १६मधूनच पगारदार करदाते रिटर्न भरू शकणार आहेत.

आधारवरूनही रिटर्न भरता येणार

जर कंपनीने तुम्हाला फॉर्म १६ दिला आहे तर, तुम्ही तातडीने इन्कम टॅक्स रिटर्न भरवा. रिटर्न भरताना काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. त्यात तुमचे आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक असायला हवे. त्याशिवाय तुम्हाला रिटर्न भरता येणार नाही. ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही. त्यांना त्यांच्या आधारकार्डाच्या साह्यानेही टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. टॅक्स भरण्यापूर्वी सेक्शन ८० अंतर्गत तुम्हाला मिळणाऱ्या सवलतींची कागदपत्रे तुमच्या सोबत ठेवावी. यात इन्शुरन्स प्रिमियम पावत्या, पीपीएफ, एनपीएस पावत्या  तुम्हाला दाखवाव्या लागणार आहेत. त्याशिवाय कंपनीकडून फॉर्म १६ मागून घ्या. तुमच्याकडे तुमची एफडी सर्टिफिकेट्स असतील, तर तु्म्ही स्वतः ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IT Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी यंदा मुदतवाढ मिळणार नाही? Description: IT Return: पगारदार आणि इतरांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुढे ढकलण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैच्या आतच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सल्ला कन्सल्टंट देत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola