Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ जवळ आली; वाचा ही बातमी

काम-धंदा
Updated Jun 13, 2019 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Income Tax Return: गेल्या काही वर्षांत इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. यंदा प्राप्तिकर विभागाने आयटीआर-१ आणि आयटीआर-४ असे नवीन फॉर्म दिले आहेत. त्याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

Income tax return
इन्कम टॅक्स रिटर्न संदर्भात संपूर्ण माहिती घेणे आवश्यक  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : आपल्या भारत देशात एप्रिल ते मार्च आर्थिक वर्ष असते. या आर्थिक वर्षानुसारच प्राप्तिकर खाते कर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) भरून घेते. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत. प्राप्तिकर भरण्यास पात्र असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांनीच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे फायदेशीर असते. यात नोकरदार वर्गाला त्याच्या मागील आर्थिक वर्षात मिळालेल्या पगाराची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी लागते. त्यावरून संबंधित व्यक्ती प्राप्तिकर भरण्यास पात्र किंवा अपात्र ठरवली जाते. व्यवसायिकांना त्यांच्या करंट अकाऊंटचे आणि इतर व्यवहारांचे डिटेल्स द्यावे लागतात. प्राप्तिकर खाते दर वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फॉर्म आणि पद्धत अपडेट करत असते. गेल्या काही वर्षांत इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. यंदा प्राप्तिकर विभागाने आयटीआर-१ आणि आयटीआर-४ असे नवीन फॉर्म दिले आहेत. सध्या https://www.incometaxindiaefiling.gov.in या प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर हे फॉर्म आपल्याला उपलब्ध आहेत.

३१ जुलै अंतिम मुदत

या वर्षी प्राप्तिकर खात्याने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलै ही मुदत जाहीर केली आहे. दरवर्षीप्रमाणे शेवटच्या टप्प्यात यात वाढ होऊन ही तारीख ३१ ऑगस्ट होण्याची शक्यता आहे. पण, तरीदेखील करदात्यांनी ३१ जुलैच्या आतच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे उचित ठरणार आहे. जर मुदतवाढ मिळाली नाही तर, जुलै महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात धावपळ करून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सध्या देण्यात आलेल्या मुदतीच्या आतच इन्कम टॅक्स रिटर्न भरून घ्यावा. आयटीआर-१ या फॉर्मला सहज असे नाव देण्यात आले आहे. या फॉर्मच्या माध्यमातून कमीत कमी कागदपत्रे आणि आकडेवारीसह इन्कम टॅक्स रिटर्न भरणे शक्य होणार आहे. नोंदणीकृत कंपन्या, त्यांचे संचालक, कंपन्यांमधील गुंतवणूकदार, तसेच अनिवासी भारतीय या फॉर्मच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाहीत. ज्या करदात्यांना प्राप्तिकरात सवलत हवी आहे त्यांना त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. यंदा प्राप्तिकर खात्याने ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्या नागरिकांची मिळकत तीन ते पाच लाखांच्या दरम्यान आहे त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. यातून सुपर सिनिअर सिटिझन्स म्हणजेच, ८० वर्षांच्या वरील नागरिकांना सवलत देण्यात आली आहे.

ही कागदपत्रे अत्यावश्यक

  1. पॅनकार्ड (आधारकार्डाशी लिंकिंग अत्यावश्यक)
  2. करमुक्त असलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे (उदा. पीपीएफमधील गुंतवणूक)
  3. नोकरदारांसाठी टीडीएसचा लेखा जोखा असलेला फॉर्म-१६
  4. एखाद्या कंपनीला सेवा दिली असल्यास टीडीएसचे प्रमाणपत्र
  5. जीवनविमा, अपघात विमा भरल्याच्या पावत्या
  6. शेअर्समध्ये गुंतवणूक असेल तर, गुंतवणूक केलेल्या कंपनीचा पॅनकार्ड क्रमांक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ जवळ आली; वाचा ही बातमी Description: Income Tax Return: गेल्या काही वर्षांत इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. यंदा प्राप्तिकर विभागाने आयटीआर-१ आणि आयटीआर-४ असे नवीन फॉर्म दिले आहेत. त्याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola