इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आजच जमा करा 'ही' कागदपत्रे

काम-धंदा
Updated Jul 16, 2019 | 16:09 IST

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरूवात झाली आहे. जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. नेमकी कुठली ही कागदपत्रे आहेत त्याची सविस्तर माहिती पाहा.

Income Tax Return
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आजच जमा करा 'ही' कागदपत्रे 

थोडं पण कामाचं

  • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै
  • पाहा ITR भरण्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे
  • आधार-पॅन कार्ड शिवाय इतरही कागदपत्रे आवश्यक

ITR Important Documents: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१९ आहे. जर तुम्ही आतापर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाहीये तर आजच तयारी करा. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे जमा करणं आवश्यक आहे. 

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन्ही डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत तुम्हाला आर्थिक वर्ष २०१८-१९ चं रिटर्न भरावं लागणार आहे. आयटीआर भरण्यासाठी सर्व कागदपत्रे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत जमा करुन घ्या. आयटीआर भरताना ही कागदपत्रे तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे, ही कागदपत्रे सोबत असल्यास तुम्हाला आयटीआर भरताना अडचण येणार नाही.

फॉर्म १६

जर तुम्ही नोकरी करता तर तुमच्या कागदपत्रांमध्ये फॉर्म १६ असणं आवश्यक आहे. या फॉर्म शिवाय तुम्ही आयटीआर भरु शकत नाहीत. आयटीआर हे एक टीडीएस सर्टिफिकेट आहे जे तुमची कंपनी तुम्हाला देते. फॉर्म १६ मध्ये दोन भाग असतात. पहिला म्हणजे पार्ट ए आणि दुसरा पार्ट बी. पार्ट ए मध्ये सर्व टॅक्स कटिंगची माहिती असते. तर पार्ट बी मध्ये ग्रॉस सॅलरी ब्रेकअप आणि अलाऊंसेस या सर्वांची माहिती असते.

बँक आणि पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या व्याजाचं सर्टिफिकेट

आयटीआरमध्ये तुम्हाला व्याज म्हणून मिळणाऱ्या रकमेची माहिती देणं आवश्यक असतं. त्यामुळे तुम्हाला सेव्हिंग अकाऊंट आणि फिक्स्ड डिपॉझिटमधून मिळणाऱ्या व्याजाची माहिती द्यावी लागते. व्याज म्हणून १० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स सूट मिळते. वरिष्ठ नागरिकांना यावर ५० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते.

टॅक्स सेव्हिंग डॉक्यूमेंट्स

जर तुम्ही आर्थिक वर्षाच्या दरम्यान कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केली आहे तर त्याचे कागदपत्रे आवश्यक जोडा. तुम्हाला सेक्शन ८०सी, ८०सीसीसी आणि ८०सीसीडी (१) अंतर्गत सूट मिळते. या अंतर्गत तुम्ही १.५ लाख रुपयांपर्यंत एक वर्षात क्लेम करु शकता. तुम्ही ईपीएफ, पीपीएफ, इंश्युरन्स आणि एनपीएस संदर्भातील सर्व कागदपत्रे जमा करा. यासोबतच होम लोनची एकूण रक्कम, ट्यूशन फी सारखी कागदपत्रे जमा करा. जर हेल्थ इंश्युरन्सचा प्रिमिअम भरता तर तुम्हाला वर्षाला २५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते. तसेच जर तुम्ही दान केलं आहे तर त्याचीही पावती जमा करा.

होम लोन स्टेटमेंट

जर तुम्ही होम लोन घेतलं आहे तर तुमचं लोन स्टेटमेंट आवश्यक घ्या. यामध्ये तुम्हाला मुळ रक्कम आणि व्याज याची माहिती मिळते. व्याजासाठी तुम्ही अधिकाधिक २ लाख रुपये क्लेम करु शकतात. जर तुम्ही नुकतचं एखादं घरं खरेदी केलं आहे तर त्यासाठी भरलेल्या स्टॅम्प ड्युटीच्या रकमेची माहिती घ्या.

कॅपिटल गेन डॉक्युमेंट

जर तुम्ही प्रॉपर्टी, म्युच्युअल फंड किंवा शेअरची आर्थिक वर्षाच्या दरम्यान विक्री केली आहे तर यामधून मिळालेल्या उत्पन्न किंवा नुकसानाची माहिती द्यावी लागेल याला कॅपिटल गेन म्हणतात. जर तुम्ही एखाद्या अनलिस्टेड कंपनीत गुंतवणूक केली आहे तर तुम्हाला आयटीआर २ मध्ये त्याची माहिती द्यावी लागणार आहे.

फॉर्म १६ 

या फॉर्ममध्ये तुम्ही भरलेल्या सर्व टॅक्सची माहिती असते. यामध्ये टॅक्स कटिंग आणि त्यामध्ये मिळणाऱ्या रिफंडची माहिती सुद्धा असते. हा फॉर्म तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवरुन अगदी सहज डाऊनलोड करु शकतात.

बँक अकाऊंट

जर तुमचं एकापेक्षा अधिक बँकेत अकाऊंट आहे तर सर्व या सर्व बँक अकाऊंटचं वर्षभराचं स्टेटमेंट तुम्हाला द्याव लागणार आहे. जर तुम्ही हे सर्व कागदपत्रे जमा केले आहेत तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कुठलीही अडचण येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आजच जमा करा 'ही' कागदपत्रे Description: Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरूवात झाली आहे. जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. नेमकी कुठली ही कागदपत्रे आहेत त्याची सविस्तर माहिती पाहा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...