Income Tax: मृत व्यक्तीचा टॅक्स रिटर्न भरायचा असेल तर, तुम्हाला ही माहिती असायलाच हवी!

काम-धंदा
Updated Jul 23, 2019 | 20:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Income Tax: मृत व्यक्तीच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोण कोणती काळजी घ्यावी हे खूप महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीनंतर त्याच्या वारसाला पुढच्या आर्थिक बाबी सांभाळाव्या लागतात. रिटर्न भरणे ही एक जबाबदारी असते.

Income tax return
मृत व्यक्तीचा इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • मृत व्यक्तीचा इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल?
 • कायदेशीर वारसाला भरावा लागणार टॅक्स रिटर्न
 • ऑनलाईन भरणा करताना महत्त्वाची कागदपत्रे जवळ असणे गरजेचे

मुंबई : आपल्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं म्हणजे थोडं कटकटीचं काम. त्यामुळं एखादा सीए मित्र शोधा, त्याच्याकडून करून घ्या किंवा ऑफिसच्या अकाऊंट विभागातीलच एखाद्याला ते काम द्या, असं करून प्रत्येकजण त्यातूनं अंग काढून घेत असतो. पण, आपल्या एखाद्या प्रियजनाच्या मृत्यूनंतर त्याचा इन्कम टॅक्स भरणं हे जास्त वेदनादायी असतं. अर्थातच एखाद्याला आपल्या आयुष्यातून गमावण्या इतपत नाही. पण, सरकारी काम असल्यामुळं ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला एका प्रवासातून जावं लागलं. मृत व्यक्तीच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोण कोणती काळजी घ्यावी हे खूप महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीनंतर त्याच्या वारसाला पुढच्या आर्थिक बाबी सांभाळाव्या लागतात. त्यातील रिटर्न भरणे ही एक प्रमुख जबाबदारी असते. कायद्यानुसार संबंधित वारसाला मृत व्यक्तीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मृत्यू झालेल्या तारखेपर्यंतचा रिटर्न भरायचा असतो. त्यातही काही महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागते.

कायदा काय सांगतो

प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्स कायद्यातील कलम १५९नुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याचे रिटर्न फाइल करावे लागते. रिटर्न फाइल करताना, एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणे त्याचा रिटर्न फाइल करावा लागतो. कायद्यानुसार त्याचा वारस हा त्या मृत व्यक्तीचा टॅक्स भरण्यासाठी जबाबदार असतो. कायद्यानुसार मृत व्यक्तीचा मोठा मुलगा, पती किंवा पत्नी त्याचे वारस असतात. पण, मृत व्यक्तीने मृत्यूपूर्वी कायदेशीर पद्धतीने एखाद्याला आपला वारस जाहीर केला असेल, तर ती व्यक्ती त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकते. त्यासाठी त्या वारसाला कायदेशीर कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. रिटर्न फाइल करताना मृत व्यक्तीची सगळी कागदपत्रे तयार ठेवा त्यामध्ये सेव्हिंग अकाऊंट स्टेटमेंट, आधी वर्षाचे इन्कम टॅक्स विवरण पत्र, इंटरेस्ट सर्टिफिकेट्स, कॅपिटल गेन स्टेटमेंट आदी तयार असणे आवश्यक आहे. या संदर्भात टॅक्स सल्लागारांची मदत घेता येईल.

असा करा रिटर्न फाइल

 1. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग साईटवर जाऊन क्रेडेंशिय्लसच्या साह्याने लॉग-इन करा
 2. त्यानंतर My Account वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊन मेन्यूमध्ये 'Register as legal heir' हा ऑप्शन निवडा
 3. ‘select the type of request’ टॅबमध्ये न्यू रिक्वेस्ट हा ऑप्शन निवडा आणि स्वतः मृत व्यक्तीच्या नावाने रजिस्टर करा
 4. संबंधिताचा मृत्यूचा दाखला, मृताचे पॅनकार्ड आणि आपले पॅनकार्ड, वारस असल्याचा न्यायालयीन पुरावा किंवा स्थानिक स्वराज संस्थेतीन मिळालेला वारस असल्याचा दाखला याची कॉपी सबमिट करा.
 5. प्राप्तिकर विभाग या कागदपत्रांची छाननी करून अप्रूवर किंवा रिजेक्शनचा पर्याय देईल. ई-मेल किंवा एसएमएसद्वारे हा पर्याय मिळेल.

अप्रुवल मिळाल्यानंतर काय?

 1. मृताचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अप्रुवल मिळाल्यानंतर क्रेडेंशियल्सचा वापर करून टॅक्स फाइलिंग वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर पुन्हा लॉग इन करा.
 2. डॅशबोर्डमध्ये टॅबवर ई-फाईलवर क्लिक करा. त्यानंतर 'Income Tax Return' वर क्लिक कार. संबंधित रिटर्न फॉर्म भरा त्यानंतर ‘preview and submit button’वर क्लिक करून संपूर्ण माहिती तपासून घ्या.
 3. आधारशी निगडीत ओटीपीचा वापर करून टॅक्स रिटर्नची तपासणी करा.

कारवाई होऊ शकते

एका जिवंत नसलेल्या व्यक्तीच्या टॅक्सची माहिती तुम्ही भरत असल्यामुळे जर, त्यात चूक झाली तर, प्राप्तिकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. पण, ही कारवाई मृताकडून वारसाला मिळणाऱ्या मालमत्ते संदर्भातच होऊ शकते. तशाच पद्धतीने रिफंड असेल तर त्या वारसाच्या खात्यावर तो जमा केली जाईल. मृताचे रिटर्न फाईल झाल्यानंतर त्याच्या नावचे टॅक्स अकाऊंट कायमस्वरूपी डिलिट होते. मृताचा टॅक्स रिटर्न फाईल करताना घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

आदिल शेट्टी, सीईओ, बँक बाजार

(डिस्क्लेमर : हा लेख केवळ प्राथमिक माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिण्यात आला आहे. रिटर्न फाईल करताना एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Income Tax: मृत व्यक्तीचा टॅक्स रिटर्न भरायचा असेल तर, तुम्हाला ही माहिती असायलाच हवी! Description: Income Tax: मृत व्यक्तीच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोण कोणती काळजी घ्यावी हे खूप महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीनंतर त्याच्या वारसाला पुढच्या आर्थिक बाबी सांभाळाव्या लागतात. रिटर्न भरणे ही एक जबाबदारी असते.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...