Income Tax Returns | प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर, २.३८ कोटींनी दाखल केले आयटीआर रिटर्न

Income Tax Returns | प्राप्तिकर विवरणपत्र ई-फायलिंग पोर्टल (Income Tax e-filing portal)वर २०२१-२२ या वर्षात २.३८ कोटीपेक्षा जास्त आयटीआर रिटर्न दाखल झाले आहेत. सोबत प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की २०२०-२१ या वर्षासाठी ज्यांनी अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेले नाही त्यांनी ते ई-फायलिंग पोर्टलद्वारे दाखल करावे.

Income Tax Returns
प्राप्तिकर विवरणपत्र  
थोडं पण कामाचं
  • करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलवर २०२०-२१ साठीचे आपले आयटीआर रिटर्न लवकर जमा करावे
  • सरकारने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली
  • आता प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१

Income Tax | नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department)मंगळवारी माहिती दिली की २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २.३८ कोटी नागरिकांनी आतापर्यत आपले प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Returns)दाखल केले आहे. यामध्ये १.६८ कोटी पेक्षा अधिक आयटीआरवर प्रक्रिया झाली आहे. तर ६४ लाखांपेक्षा अधिक प्रकरणात रिफंड देण्यात आले आहेत. (Income Tax Returns : Last date to file ITR returns is 31st December, till now 2.38 crore tax payers have filed it)

कोरोनामुळे वाढवली अंतिम मुदत

प्राप्तिकर विभागाने ट्विट करत माहिती दिली आहे की प्राप्तिकर विवरणपत्र ई-फायलिंग पोर्टल (Income Tax e-filing portal)वर २०२१-२२ या वर्षात २.३८ कोटीपेक्षा जास्त आयटीआर रिटर्न दाखल झाले आहेत. सोबत प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की २०२०-२१ या वर्षासाठी ज्यांनी अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेले नाही त्यांनी ते ई-फायलिंग पोर्टलद्वारे दाखल करावे. सरकारने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत दोनदा वाढवली आहे. आता ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ अशी आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सरकारने ही मुदत वाढवली होती.

प्राप्तिकर विभागाने दिले होते नवीन माहिती विवरण

या महिन्याच्या सुरूवातीला प्राप्तिकर विभागाने पोर्टलवर नवे वार्षिक माहिती विवरण (AIS)जाहीर केले होते. यामुळे करदात्यांना ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्रदाखल करण्याबरोबरच सर्व प्रक्रियेविषयीचा व्यापक दृष्टीकोन मिळतो. एआयएसमध्ये व्याज, लाभांश, शेअरची खरेदी-विक्री, म्युच्युअल फंडातील व्यवहार, परदेशातील व्यवहार आणि इतर आर्थिक बाबींशी निगडीत माहितीचा समावेश आहे. करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना कोणताही माहिती देण्यास विसरू नये यासाठी विभागाकडून हे मार्गदर्शन देण्यात आले आहे.

नवीन एआयएस करदात्यांना सोप्या पद्धतीने सर्व माहिती देते. यामुळे करदात्याला एकूण मूल्य दिसते त्यामुळे त्याला प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास मदत होते. विभागाद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की जर कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास करदाते ऑनलाइन फीडबॅक दाखल करू शकतात. ऑनलाइन फीडबॅकव्यतिरिक्त करदाते एआयएस युटिलिटीचादेखील वापर करू शकतात. जर करदात्याने फीडबॅक सबमिट केले तर टीआयएसमध्ये मिळालेली माहिती ताज्या वेळेनुसार अपडेट केली जाईल.

उशीर केल्यास लागणार दंड

इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे यावर्षी सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यत वाढवली आहे. नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये वारंवार येत असलेल्या अडचणींमुळे सरकारने ही मुदत वाढवली होती. नव्या पोर्टलमधील बऱ्याचशा अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. मात्र जरी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकत असलात तरी जर उत्पन्न करपात्र असेल तर भराव्या लागणाऱ्या करावर (Income Tax) तुम्हाला दंड द्यावा लागेल. हा दंड एक टक्का दर महिना या पद्धतीने आकारला जाणार आहे. अर्थात हा दंड तेव्हाच लागेल जेव्हा तुम्ही भरायचा प्राप्तिकर १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी