Income Tax Tips | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे का? कशी कराल करबचत? या आहेत करबचतीच्या टिप्स...

Mutual Fund Investment : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल आणि चालू आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) सादर केले जाईल. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी आत्तापासूनच नियोजन करायला हवे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात (Mutual Funds)गुंतवणूक केली असेल आणि चालू आर्थिक वर्षात तुमची गुंतवणूक काढून घेतली असेल, तर कराची वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Income Tax Tips for Mutual Funds
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी करा करबचतीचे नियोजन 
थोडं पण कामाचं
  • 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल, प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्यापूर्वी जाणून घ्या करबचतीच्या टिप्स
  • म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी करा करबचतीचे नियोजन
  • अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली नफ्याचे नियम काय असतात

Income Tax Tips for Mutual Funds : नवी दिल्ली  :  1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल आणि चालू आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) सादर केले जाईल. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी आत्तापासूनच नियोजन करायला हवे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात (Mutual Funds)गुंतवणूक केली असेल आणि चालू आर्थिक वर्षात तुमची गुंतवणूक काढून घेतली असेल, तर कराची वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठीच्या कर बचतीच्या टिप्स (Tax Saving Tips) तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची पूर्तता केली नसेल, तर नियोजनासोबतच गुंतवणुकीची रक्कम काढून देखील फायदा मिळू शकतो.  (Income Tax Tips for investment in mutual funds, check the details)

अधिक वाचा : Small Savings Schemes Update | तुमच्यासाठी आनंदाची बातमी! एप्रिल-जून 2022 साठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे...व्याजदरात बदल नाही

जर तुम्ही अल्प मुदतीचा भांडवली नफा कमावला असेल, तर या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यावर 15% कर आकारला जातो. दीर्घकालीन भांडवली नफा 1 लाखांपर्यंत करमुक्त आहे. भांडवली नफा त्यापेक्षा जास्त असल्यास 10 टक्के कर आकारला जातो. भांडवली नफ्याचा नियम म्युच्युअल फंडांनाही लागू होतो. मात्र डेट फंड आणि इक्विटी फंडांसाठी हा नियम वेगळा आहे.

इक्विटी फंडांसाठी आकारला जाणार प्राप्तिकर

जर म्युच्युअल फंडाद्वारे इक्विटी प्रकारामधील गुंतवणूक 65 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला इक्विटी फंड म्हणतात. इक्विटी फंडांसाठी, 1 वर्षापेक्षा कमी गुंतवणुकीवर अल्प-मुदतीचा भांडवली नफा कर (STCG)आकारला जातो. तर एका वर्षापेक्षा जास्त काळ केलेल्या गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो. अल्पकालीन नफ्यावर 15 टक्के कर आकारला जातो. याशिवाय उपकर आणि अधिभार लावला जातो.

अधिक वाचा : PAN-Aadhaar Linking | तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल? पाहा सोपी पद्धत

दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर

जर तुम्ही इक्विटी फंडात 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) म्हणजेच दीर्घकालीन भांडवली नफा म्हणतात. 1 लाखांपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त असतो. त्यापेक्षा जास्त भांडवली नफ्यावर 10 टक्के कर लागतो. याशिवाय या गुंतवणुकीवर उपकर आणि अधिभार स्वतंत्रपणे आकारला जातो.

अधिक वाचा : Homebuyers alert | तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कर वजावटीचा लाभ...पाहा किती बसणार फटका

डेट फंड प्रकारासाठी आकारला जाणारा प्राप्तिकर

जर म्युच्युअल फंडाद्वारे 65 टक्के गुंतवणूक डेट प्रकारात करण्यात आली असेल तर त्याला डेट फंड म्हणतात. डेट फंडांसाठी, तीन वर्षांपेक्षा कमी म्हणजे 36 महिने अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यात येतात. त्यानंतर दीर्घकालीन भांडवली नफ्याचा नियम लागू होतो. डेट फंडामध्ये गुंतवणूक केल्याने, अल्पकालीन भांडवली नफा तुमच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो. प्राप्तिकर कायद्यानुसार कराचा दर लागू होतो. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर २०% कर आकारला जातो. याशिवाय उपकर आणि अधिभार लावला जातो. यामध्ये कोणतीही सवलतीची मर्यादा म्हणजे फ्री लिमिट नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी