CNG,PNG Price Increase : महगाईचा तडका ! CNG सह घरगुती पाईपलाईन गॅस दरात वाढ; शनिवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jan 09, 2022 | 07:41 IST

पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) च्या दरवाढीमुळे (Inflation) हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दर वाढीचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Increase in domestic pipeline gas rates with CNG
CNG सह घरगुती पाईपलाईन गॅस दरात वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे MGL च्या इनपुट गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे.
  • फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सीएनजीच्या दरात 18 रूपयांनी वाढ.
  • नवीन दरानुसार PNG 39.50 प्रति युनिट दराने मिळणार आहे.

CNG,PNG Price : मुंबई :  पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) च्या दरवाढीमुळे (Inflation) हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दर वाढीचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) आणि परिसरात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो  2.50 रुपयांनी, तर घरगुती पाईप (PNG) गॅस 1.50 रुपये प्रति युनिट महाग झाला आहे. शनिवारच्या मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू झाली आहे.  बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे MGL च्या इनपुट गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे CNG प्रति किलोमागे 2.50 तर PNG प्रति  युनिटमागे 1.50 रूपयांनी वाढवण्यात आला आहे.

या सुधारित दर वाढीनुसार सर्व करांसह CNG आता 66 रूपये प्रति किलो तर PNG 39.50 प्रति युनिट दराने मिळणार आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या दर वाढीमुळे धक्का बसणार आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसणार आहे. सतत होणाऱ्या दरवाढीला सामान्य जनता कंटाळली आहे. 

वर्षभरात 18 रूपयांनी वाढला सीएनजी गॅसचा दर

गेल्या वर्षभरात म्हणजे फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सीएनजीच्या दरात 18 रूपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 48 रूपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता जानेवारी 2022 मध्ये 66 रूपये प्रति किलोने मिळणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी