मुंबई : गृहनिर्माण कर्ज कंपनी एचडीएफसी लिमिटेडनेही कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी लिमिटेडने त्यांच्या मानक कर्जदरात 0.30 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे बँकेच्या विद्यमान आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी कर्ज महाग होईल. HDFC लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ 9 मे पासून लागू होणार आहे. (Increased tension among home buyers, now home loans have become expensive)
अधिक वाचा : LPG Price: घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना बसला मोठा झटका
नवीन कर्जदारांसाठी सुधारित दर 7 टक्क्यांपासून ते 7.45 टक्क्यांपर्यंत त्यांची पत आणि कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतात. त्याची सध्याची श्रेणी 6.70 टक्के ते 7.15 टक्के आहे. जर आपण HDFC च्या विद्यमान ग्राहकांबद्दल बोललो तर त्यांच्यासाठी व्याजदर 0.30 टक्क्यांनी वाढतील.
अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 3 रुपयांवरून पोचला 1300 रुपयांच्या पार, 1 लाखाचे झाले 5 कोटींपेक्षा जास्त...
HDFC ने मे महिन्याच्या सुरूवातीस आपला बेंचमार्क कर्ज दर ०.०५ टक्क्यांनी वाढवला होता, ज्यामुळे विद्यमान कर्जदारांसाठी कर्जाचे मासिक हप्ते (EMIs) महाग झाले.
याआधी, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियासह इतर अनेक कर्ज देणाऱ्या संस्थांनीही व्याजदर वाढवले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर बँकांकडून सातत्याने हा निर्णय घेतला जात आहे.