Cyber crime: इंटरनेट वापरत असाल तर सावधान! सायबर सुरक्षा रामभरोसे

काम-धंदा
Updated Apr 19, 2019 | 08:39 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Cyber crime : जोपर्यंत इंटरनेट सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार नाही तोपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये अडथळे येतच राहतील, असं मत भारतातून व्यक्त व्हायला लागलंय. त्यामुळे कंपन्यांची चिंता वाढलीय.

Indian experts worried about cyber security
सायबर सुरक्षेविषयी चिंता वाढली   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • सायबर सुरक्षा सध्या सर्वाधिक चिंतेची बाब
 • सायबर सुरक्षेविषयी अजूनही संभ्रमावस्था
 • सायबर सुरक्षेशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था अशक्य

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवलं. पण, ते स्वप्न सत्यात उतरण्यात अनेक अडथळे येताना दिसत आहेत. सध्या सायबर सिक्युरिटी हा सध्या सगळ्यात चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, त्यावर उपाय काढण्याचा मार्गही सापडत नसल्याचे दिसत आहे. भारतात जवळपास ६० टक्के जणांचं असं म्हणणं आहे की, दिवसेंदिवस इंटरनेट असुरक्षित होत आहे आणि त्यावर उपाय योजना करण्याविषयी ते अजूनही स्पष्ट उत्तर देऊ शकत नाहीत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा विषय चिंतेचा बनला आहे.

‘एक्सेंचर’च्या एका नव्या रिपोर्टचा हवाला देण्यात आला आहे. 'डिजिटल अर्थव्यवस्थेला सुरक्षित करणे : रिइंवेंटिंग द इंटरनेट फॉर ट्रस्ट' या शीर्षकाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारत जळपास ७७ टक्के जणाचं असं म्हणणं आहे की, जोपर्यंत इंटरनेट सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार नाही तोपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये अडथळे येतच राहतील.

या अहवालानुसार सायबर हल्ल्यांमुळे जगभरातील कंपन्यांना पुढच्या पाच वर्षांसाठी ५ हजार २०० अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याबाबत ‘एक्सेंचर’च्या भारतातील युनिटचे वरिष्ठ निदेशक अनिंद्य बसू म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांच्या अपडेटेड टेक्नॉलॉजीच्या तुलनेत इंटरनेटच्या सुरक्षेचे उपाय मागे पडत आहेत. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची धोका निर्माण झाला आहे.’ हा निष्कर्ष काढताना देशभरातील जवळपास १ हजार ७०० सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये भारतातील जवळपास १०० कंपन्यांचे अधिकार सामील होते. सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जताना आता संघटित प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत या अहवालात ६० टक्के जणांनी नोंदवले आहे. कारण, कोणीही एकटा या आव्हानाचा सामना करून शकत नाही, यावर सगळ्यांचे एकमत आहे.

 

काय काळजी घ्याल?

 1. तुमची कोणतिही संवेदनशील माहिती कोणालीही शेअर करू नका
 2. तुमचा बँक अकाउंट नंबर, कस्टमर आयडी, सीव्हीसी कोड, एटीएम पासवर्ड कोणाही अनोळखीला सांगू नका
 3. तुमचा पासवर्ड आठ कॅरेक्टर्सपेक्षा जास्त ठेवा
 4. तुमचा पासवर्ड तुमची जन्मतारीख, शाळेचे नाव असा असू नये
 5. पासवर्ड अवघड असावा आणि तो लक्षात ठेवण्याची सवय करा
 6. तुमचा कॉम्प्युटर लॉक करूनच जागेवरून उठा
 7. ऑनलाईन शॉपिंग करताना तुमच्या स्वतःच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल डिवाइसवरूनच करा
 8.  तुमच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरला अँटीव्हायरस सिस्टम बसवून घ्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cyber crime: इंटरनेट वापरत असाल तर सावधान! सायबर सुरक्षा रामभरोसे Description: Cyber crime : जोपर्यंत इंटरनेट सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार नाही तोपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये अडथळे येतच राहतील, असं मत भारतातून व्यक्त व्हायला लागलंय. त्यामुळे कंपन्यांची चिंता वाढलीय.
Loading...
Loading...
Loading...