India Post GDS Result 2022 5th List Update :नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी आणि करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने (India Post)ग्रामीण डाक सेवक भरती (GDS Result) साठीची 5वी यादी प्रसिद्ध केली आहे. इंडिया पोस्ट जीडीएस भरती (India Post GDS) परीक्षेत बसलेले उमेदवार आता इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट, म्हणजे indiapostgdsonline.gov.in वर जाऊन त्यांचा निकाल ऑनलाइन तपासू शकतात. त्याचबरोबर डाउनलोडदेखील करू शकतात. पोस्ट ऑफिसकडून ही मेगाभरती केली जाते आहे. देशभरात एकूण 38,926 रिक्त पदांसाठी ही भरती आहे. यादीत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. (India Post GDS Result 2022 5th List declared, check the list online)
अधिक वाचा : KALYAN : मन हेलावणारी घटना ! अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू
पोस्ट ऑफिसच्या या भरती (India Post GDS Recruitment 2022) मोहिमेद्वारे एकूण 38,926 रिक्त जागा भरल्या जातील. देशाच्या अनेक राज्यांमधील ही पदे भरली जाणार आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, झारखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र यासह देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण डाक सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती घेण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये ग्रामीण डाक सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी टपाल विभागाने ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी टपाल विभागाने निवडलेल्या उमेदवारांच्या चार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आता पाचवी यादी जाहीर झाली आहे. इंडिया पोस्ट जीडीएस निकाल कसा तपासायचा ते जाणून घ्या.
अधिक वाचा : Mumbai News: मुंबईत महिलांच्या डब्ब्यात घुसून एका व्यक्तीकडून महिलेचा विनयभंग, अंधेरीतली घटना
अधिक वाचा : Mumbai AC Local : एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला; सुदैवाने कोणीही जखमी नाही, पश्चिम रेल्वेने घेतली दखल
इंडिया पोस्ट जीडीएस पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. यादीमध्ये नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांसमोर आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे लागेल. दस्तऐवज पडताळणीची अंतिम तारीख 06 ऑक्टोबर 2022 ही आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराची कागदपत्र पडताळणी केली जाणार नाही, असे जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. आवश्यक कागदपत्रांची यादी तुम्हाला अधिसूचनेत पाहता येणार आहे.
मागील काही वर्षात टपाल विभागानेदेखील कात टाकली आहे. पोस्ट ऑफिसमधील सेवांचे आधुनिकीकरण करत अनेक नवीन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजना आजही सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत.