इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत ऑनलाईन उघडा खाते, 'ही' आहे प्रोसेस

काम-धंदा
Updated May 03, 2021 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPPB Account: इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक डिजिटल सेव्हिंग्स अकाउंट एक वर्षासाठीच असते. खाते सुरू केल्यानंतर एक वर्षाच्या आत त्या खात्यासाठीच्या बायोमेट्रीक प्रक्रियेला पूर्ण करणे बंधनकारक आहे.

India Post Payment Bank Account, digital facility
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक डिजिटल सुविधा 

थोडं पण कामाचं

  • इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची डिजिटल सेवा
  • आयपीपीबी मोबाईल अॅप
  • ऑनलाईन उघडा खाते

नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमध्ये (IPPB) डिजिटल माध्यमातून सोप्या पद्धतीने खाते उघडता येते. इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक (India Post Payment Bank)मोबाईल अॅपद्वारे डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धतीने बचत खाते उघडण्याची सुविधा देते. 

आयपीपीबी मोबाईल अॅपची सुविधा


पोस्ट ऑफिस खातेधारक आयपीपीबी मोबाईल अॅपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने बेसिक बॅंकिंग व्यवहार करू शकतात. आधी ग्राहकांना बॅलन्स चेक करण्यासाठी, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. आता इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमुळे ग्राहकांची बॅंकिंग सेवा सोपी झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठी सुविधा मिळाली आहे.

घरबसल्या उघडा इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमध्ये खाते


जर तुमच्याकडे आयपीपीबी खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जायचा वेळ नसेल आणि पोस्ट ऑफिसमधील रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून सुटका हवी असेल तर तुम्ही घरबसल्याच डिजिटल खाते उघडू शकता. आयपीपीबी अॅप डाऊनलोड करून तुम्ही त्याद्वारे डिजिटल बचत खाते उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी अर्जदाराला १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे भारतीय नागरिक असले पाहिजे.

वर्षभरात बायोमेट्रिक पूर्ण करणे आवश्यक


डिजिटल सेव्हिंग्स खाते हे फक्त एकच वर्षासाठी वैध असते. खाते उघडल्याच्या एक वर्षाच्या आत तुम्हाला त्या खात्याच्या बायोमेट्रिक प्रक्रियेला पूर्ण करायचे असते. यानंतर या खात्याला नियमित बचत खात्यात रुपांतरीत केले जाते. खाते उघडण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत अशी आहे,

  1. स्टेप १. आपल्या मोबाईल फोनमध्ये आयपीपीबी मोबाईल बॅंकिंग अॅप डाऊनलोड करा. यानंतर आयपीपीबी मोबाईल बॅंकिंग अॅप ओपन करून  ‘Open Account’ वर क्लिक करा.
  2. स्टेप २. इथे तुम्हाला आपला पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर भरावा लागेल.
  3. स्टेप ३. पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी भरा.
  4. स्टेप ४. आता तुम्हाला आपल्या आईचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनीची माहिती भरावी लागेल.
  5. स्टेप ५. ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. याबरोबरच तुमचे खाते सुरू होईल.
  6. स्टेप ६. तुम्ही या इन्स्टंट बॅंक अकाउंटचा वापर अॅपद्वारे करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आजही सुरक्षित आणि चांगला परतावा देतात. मागील काही वर्षात डिजिटल युगाचे वारे वाहायला लागल्यापाेसून पोस्ट ऑफिसने देखील कात टाकली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या रुपाने पोस्ट ऑफिसने अनेक नवीन सुविधा ग्राहकांसाठी आणल्या आहेत. सध्या सर्वच बॅंका मोबाईल अॅप आणि इंटरनेट बॅंकिंगची सुविधा पुरवत असतात. इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेनेदेखील ग्राहकांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पोस्ट ऑफिसच्या योजनांचे व्याजदर चांगले असतात शिवाय यात सुरक्षितता देखील असते. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आजही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी