Retail Inflation:: किरकोळ महागाईत भारत 12 प्रमुख देशांमध्ये अव्वल, जगभरात दर वाढवण्याची शक्यता

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jul 26, 2022 | 13:02 IST

महागाई दर (Inflation Rate) सर्वात व्हेनेझुएला(Venezuela) जे 167% आहे. यानंतर तुर्कीमध्ये 78.6 टक्के, अर्जेंटिनामध्ये 64 टक्के, रशियामध्ये (Russia) 15.9 टक्के आणि पोलंडमध्ये (Poland) 15.5 टक्के महागाईचा (inflation) दर आहे. ब्राझील (Brazil)मध्ये 11.9 टक्के आणि स्पेनमध्ये 10.2 टक्के महागाई दर कायम आहे.

India tops 12 major countries in retail inflation, likely to increase rates globally
भारतात किरकोळ महागाईची ट्रेन सुसाट; भारत 12 देशात अव्वल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डिसेंबरपर्यंत रेपो दर आता 4.90 टक्क्यांवरून 6 टक्क्यांच्या वर नेण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट आहे.
  • जगभरातील केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहेत.
  • व्हेनेझुएलामध्ये महागाईचा दर सर्वाधिक म्हणजे १६७ टक्के आहे.

नवी दिल्ली : महागाईने बुलेट ट्रेनपेक्षा अधिकचा वेग पकडला आहे. या महागाईची बुलेट ट्रेन सर्वच देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परंतु या किरकोळ (Retail ) महागाईत (Inflation) इतर 12 प्रमुख देशांमध्ये भारत (India) अव्वल आहे. भारतात महागाईच्या या ट्रेनने जोरात वेग पकडला आहे. जूनमध्ये भारतातील किरकोळ चलनवाढ ७ टक्क्यांच्या वर होती, तर १२ प्रमुख देशांमध्ये ते कमी होते. 

या देशांबद्दल म्हटलं तर सौदी अरेबियामध्ये किरकोळ महागाई दर वार्षिक आधारावर 2.3 टक्के आहे. चीनमध्ये ते 2.5 टक्के आहे, तर जपानमध्ये ते समान पातळीवर आहे. स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाण 3.4 टक्के आणि इंडोनेशियामध्ये 4.4 टक्के आहे. जगभरातील केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहेत. बँका व्याजदर वाढवून मागणीवर दबाव आणायचा आहे. असे असूनही, सर्व देशांमधील महागाईचा स्तर आतापर्यंत त्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त राहिला आहे.

Read Also : बेयर ग्रिल्स मांसाहारी जेवणावर मारतो ताव, असा आहे डाएट

व्हेनेझुएलामध्ये सर्वाधिक महागाई

व्हेनेझुएलामध्ये महागाईचा दर सर्वाधिक म्हणजे १६७ टक्के आहे. त्यापाठोपाठ तुर्की 78.6 टक्के, अर्जेंटिना 64 टक्के, रशिया 15.9 टक्के आणि पोलंड 15.5 टक्के आहे. ब्राझीलमध्ये 11.9 टक्के आणि स्पेनमध्ये 10.2 टक्के महागाई दर कायम आहे.

Read Also : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींमागे ईडीच्या चौकशीची पिडा

अमेरिकेतही महागाई नऊ टक्क्यांहून अधिक

महागाईच्या फटका अमेरिकेलाही बसला आहे. येथे महागाई दर 9.1 टक्के आहे. तर यूकेमध्ये हे प्रमाण 9.4 टक्के आहे. आयर्लंडमध्ये महागाई दर 9.1 टक्के, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये 8.7-8.7, नेदरलँडमध्ये 8.6, युरोझोनमध्ये 8.6 आणि कॅनडामध्ये 8.1 टक्के आहे. इटली आणि मेक्सिकोमध्ये महागाई 8-8 टक्के आहे.

सर्वात आनंदी देशातही महागाई सात टक्क्यांच्या वर

सर्वात आनंदी देश मानल्या जाणाऱ्या फिनलंडचा महागाई दर 7.8 टक्के आहे. थायलंडमध्ये महागाईचा दर 7.7 टक्के, जर्मनीमध्ये ७.६ टक्के, दक्षिण आफ्रिकेत 7.4 टक्के आणि न्यूझीलंडमध्ये 7.3 टक्के आहे. या उच्च दरांना सामोरे जाण्यासाठी, अनेक देशांनी या वर्षी मार्चपासून दरांमध्ये अचानक तीव्र वाढ केली आहे. भारताने मे महिन्यात अचानक दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करत सर्वांना धक्का दिला होता. तर जूनमध्ये बैठकीत 0.40 टक्क्यांनी वाढ झाली होती. गेल्या चार वर्षांत प्रथमच दर वाढविण्यात आले.

Read Also : जालियनवाला बागेतील विहीरीत नाही दिसणार पैसा, जाणून घ्या का?

रेपो दर 6 टक्के करण्याचे लक्ष्य

डिसेंबरपर्यंत रेपो दर आता 4.90 टक्क्यांवरून 6 टक्क्यांच्या वर नेण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेने या वर्षी 1.50 टक्क्यांवरून दर 3.4 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मार्चपासून तीन वेळा दर वाढवण्यात आले आहेत. अमेरिकेने 28 वर्षांत प्रथमच यात वाढ केली आहे. यापूर्वी 1994 मध्ये दर वाढवले ​​होते.

देश   महागाईचा दर
तायवान  2.3 टक्के
ऑस्ट्रेलिया     5.1 टक्के
सिंगापूर    5.6 टक्के
फ्रान्स  5.8 टक्के
दक्षिण कोरिया   6.00 टक्के
फीलीपींस   6.1 टक्के
भारत     7.01 टक्के

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी