Indian Army या इलेक्ट्रिक स्कूटरने भारत-चीन सीमेवर जाणार, ब्रँड इमेज सुधारण्यासाठी कंपनीची रॅली

Ola Scooter At Indo China Border : ओला इलेक्ट्रिकने हिमालयात पाच दिवसांच्या रॅलीसाठी भारतीय लष्कराशी हातमिळवणी केली आहे. या टीममध्ये आर्मी आणि ओला इलेक्ट्रिकचे १५ रायडर्स आहेत. त्यांनी कसौली येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

Indian Army electric scooter to cross Indo-China border, company rallies to improve brand image
Indian Army या इलेक्ट्रिक स्कूटरने भारत-चीन सीमेवर जाणार, ब्रँड इमेज सुधारण्यासाठी कंपनीची रॅली ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या इलेक्ट्रिक स्कूटरने भारतीय लष्कर डोंगरावर 393 किमी प्रवास करणार
  • 12 जवानांसह 3 ओला रायडर आहेत. अशा प्रकारे ही 15 जणांची टीम असेल.
  • कंपनी ब्रँड इमेज सुधारण्यासाठी रॅलीचे आयोजन.

नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकने हिमालयात पाच दिवसांच्या रॅलीसाठी भारतीय लष्कराशी हातमिळवणी केली आहे. या टीममध्ये आर्मी आणि ओला इलेक्ट्रिकचे १५ रायडर्स आहेत. त्यांनी कसौली येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली ८ जून रोजी भारत-चीन सीमेजवळ शिपकी ला येथे संपेल. इलेक्ट्रिक टू-व्हेइकलने ही रॅली पूर्ण करण्याची भारतीय लष्कराची ही पहिलीच वेळ आहे. ही रॅली 393 किमीची आहे. रॉयल एनफिल्ड आणि क्लासिक लीजेंड्ससह भारतीय लष्कराने ही रॅली पूर्ण केली आहे. ओला इलेक्ट्रिकने मे 2022 मध्ये S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर्सचा एक ग्रुप हिमालयीन प्रदेशात नेला होता. (Indian Army electric scooter to cross Indo-China border, company rallies to improve brand image)

अधिक वाचा : 

Whatsapp Features: WhatsApp व्हॉट्सअॅपवर चुकीचा संदेश पाठवला आहे? मग काळजी नको लवकरच मिळेल एडिट करण्याचा पर्याय

या रॅलीची कमान कॅप्टन व्ही.राणा यांच्याकडे असेल. इलेक्ट्रिक स्कूटरची उपयुक्तता लोकांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सांगावी हा या भेटीचा उद्देश आहे. तसेच स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात योगदान देत आहे. अशा प्रकारचा इलेक्ट्रिक स्कूटरने केलेला हा पहिलाच प्रवास आहे. 12 सैनिकांची ही टीम Ola Scooter S1 Pro सह हा प्रवास पूर्ण करेल. कसौली ते शिपकी-ला ही टीम इलेक्ट्रिक स्कूटरने सुमारे 393 किमी अंतर कापणार आहे.

अधिक वाचा : 

आयआयटी मद्रासने तयार केली झिंक एअर बॅटरी, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचा धोका कमी होणार

ओला स्कूटरमध्ये कंपनीने नवीन MoveOS 2 ऑपरेटिंग सिस्टमचे बीटा अपडेट देणे सुरू केले आहे. या अपडेटनंतर कंपनीने रिव्हर्स गियर, स्लो स्पीड आणि मायलेजशी संबंधित समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनीही ओला स्कूटरच्या या प्रवासाबद्दल ट्विट केले आहे. या क्षणाला त्यांनी अभिमानास्पद म्हटले. 12 जवानांसह 3 ओला रायडर आहेत. अशा प्रकारे ही 15 जणांची टीम असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी