Indian Cabinet Committee on Economic Affairs approves revised domestic gas pricing guidelines : भारत सरकारच्या आर्थिक विषयांच्या मंत्रिमंडळ समितीने एलपीजीचे दर निश्चित करण्याच्या नव्या फॉर्म्युलाला मंजुरी दिली आहे. हा फॉर्म्युला शनिवार 8 एप्रिल 2023 पासून देशभर लागू होईल. यामुळे देशातील स्वयंपाकाचा गॅस स्वस्त होणार आहे.
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीत सीएनजीचा दर 79.56 रुपये प्रति किलोवरून 73.59 रुपयांवर येऊन पोहोचणार आहे. तसेच दिल्लीत स्वयंपाकाच्या पाइप गॅसचा दर 53.59 रुपये प्रति हजार घन मीटरवरून 47.59 रुपये प्रति हजार घन मीटरवर येऊन पोहोचणार आहे. याच पद्धतीने मुंबईत सीएनजीचा दर 87 रुपये प्रति किलोवरून 79 रुपयांवर येऊन पोहोचणार आहे. तसेच मुंबईत स्वयंपाकाच्या पाइप गॅसचा दर 54 रुपये प्रति हजार घन मीटरवरून 49 रुपये प्रति हजार घन मीटरवर येऊन पोहोचणार आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय दर, चलन विनिमय मूल्य अशा निवडक निषकांच्या आधारे भारतातील गॅसचे दर निश्चित केले जातात. पण आता भारत सरकारने गॅसचे दर ठरविण्यासाठी नव्या फॉर्म्युलाला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातील गॅसचे दर पाच ते दहा टक्क्यांनी कमी होतील असा प्राथमिक अंदाज आहे. नव्या फॉर्म्युलात गॅसचे कमाल आणि किमान मूल्य ठरविण्यासाठी नव्या निकषांचा वापर करण्यात आला आहे. देशातले मागणी आणि पुरवठ्याचे गणित किंमती निश्चित करताना प्राधान्याने विचारात घेतले जाणार आहे.
एपीएम (Administered Price Mechanism / APM) गॅसची किंमत भारतीय बास्केटमधील कच्च्या तेलाच्या किमतीच्या दहा टक्के असेल. पण ही किंमत 6.5 डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (MMBtu / एमएमबीटीयू) पेक्षा जास्त नसेल. सध्याची गॅस किंमत 8.57 डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (MMBtu / एमएमबीटीयू) आहे.
रिकाम्या पोटी हे पदार्थ खा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा
एका महिन्यात पंधरा किलो वजन घटवण्यासाठी करा हे डाएट