भारतीय कंपनी MEIL मंगोलियात तेल शुध्दिकरण प्रकल्प उभारणार

मंगोलियाच्या पहिल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती भारत सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. पराराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंजिनियर्स इंडिया सल्लागार असलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीचे काम मेघा इंजिनीअरींग(MEIL)ला देण्यात आले आहे.

Indian company MEIL will set up an oil refining project in Mongolia
भारतीय कंपनी MEIL मंगोलियात तेल शुध्दिकरण प्रकल्प उभारणार 
थोडं पण कामाचं
  • मंगोलियाची पहिली ग्रीनफील्ड ऑइल रिफायनरीसाठी मेघा इंजिनीअरींगची निवड 
  • प्रकल्प बांधकाम आणि उर्जा प्रकल्पाची उभारणी, प्रकल्पाचे मूल्य USD 790 दशलक्ष डॉलर्स
  • भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) विकास भागीदारी उपक्रमाचा भाग

मुंबई : मंगोलियाच्या पहिल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती भारत सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. पराराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंजिनियर्स इंडिया सल्लागार असलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीचे काम मेघा इंजिनीअरींग(MEIL)ला देण्यात आले आहे. EPC करारानुसार, प्रकल्प उभारणी  मंगोलियामध्ये होणार आहे. (Indian company MEIL will set up an oil refining project in Mongolia)

अतिशय़ प्रगत तंत्रज्ञान वापरून जवळ जवळ 790 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चाचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यात  प्रकल्प इमारती  उर्जा संयत्र यांच्या उभारणीचे काम  मेघा इंजिनीअरींग तर्फे करण्यात  येईल.

रशियाकडून तेल आयातीवरचे  मंगोलियाचे  अवलंबित्व कमी करण्यासाठी, हा प्रकल्प खुप महत्वाचा आहे . शुध्दिकरण प्रकल्पाची क्षमता दररोज 30,000 बॅरल किंवा वार्षिक 1.5 दशलक्ष  येवढी असणारा आहे. यामूळे मंगोलीयातील छोट्या उद्योगांच्या वाढीला आणि आर्थिक दुष्ट्या पिछाडीवर असणाऱ्या या  देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. 

नेशन फर्स्ट हे  ब्रीदवाक्य असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि.या भारतीय कंपनीने भारताबरोबच   १८ अन्य देशात तेल आणि वायू, संरक्षण, वाहतूक, सिंचन, ऊर्जा आणि दूरसंचार या क्षेत्रात आपला  ठसा उमटवलेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी