Old is Gold: जुनी नोट किंवा नाणं तुम्हाला बनवेल मालामाल, केवळ करावं लागणार 'हे' काम

Old Note sell and earn lakh rupees: चलनातील जुनी नोट किंवा नाणे जमा करण्याचा अनेकांना छंद असतो. मात्र, याच माध्यमातून तुम्ही खूप मोठी कमाई सुद्धा करू शकता.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एखादी जुनी नोट तुम्हाला बनवेल मालामाल, घरबसल्या करावं लागेल एकच काम
  • जुन्या नोटची विक्री करुन तुम्ही लखपती बनू शकता
  • चलनातील नोट तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर विक्री करू शकता 

Indian Currency: काळानुसार चलनात अनेक बदल होत असतात. जुन्या नोटा किंवा नाणी बंद होऊन त्याऐवजी नवे चलन बाजारात उपलब्ध करुन देण्यात येतात. जर तुम्हाला वाटत असेल की, जुन्या नोटांना काहीही किंमत नाही तर मग तुम्ही चुकत आहात. कारण, जुन्या नोटा किंवा नाणी तुम्हाला एका झटक्यात लखपती बनवू शकतात. चलनातील याच जुन्या नोटा तुमचा बँक बॅलन्स वाढवण्यास मदत करु शकतात. (Indian currency old note of 786 serial number can give you lakh rupees online read in marathi)

अनेकजण जुन्या नोटांची विक्री करुन मालामाल झाले आहेत. जर तुम्हालाही याबाबत माहिती असेल तर तुम्हीही लखपती बनू शकता. यासाठी तुम्हाला केवळ हे चेक करावं लागेल की, तुमच्याकडे जुनी नोट आहे का?

हे पण वाचा : प्रत्येकाने बघावे असे आशियातील 7 धबधबे

कसे बनू शकता मालामाल? 

एनबीटीच्या एका रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीजवळ 1, 5, 10, 20, 50, 100 किंवा 2000 रुपये आहेत ज्याच्या सीरिअल नंबरमध्ये 786 क्रमांक आहे. तर तो व्यक्ती या नोटांच्या बदल्यात लाखो रुपये कमावू शकतो. याबाबत चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घरी बसल्या-बसल्या हे काम करु शकता.

ओएलएक्स (OLX), क्विकर (Quikr), ईबे (eBay) सारख्या वेबसाईटवर खरेदी केले जातात. ही जुनी नोट तुम्ही या वेबसाईटवर विक्री करू शकतात. जाणून घेऊयात या नोट किंवा नाणे तुम्ही eBay वर कशाप्रकारे विक्री करू शकता.

हे पण वाचा : स्वातंत्र्यापूर्वी असे असत AC कोच

यासाठी सर्वप्रथम www.ebay.com वर जा

त्यानंतर होम पेजवर विक्रेता म्हणून रजिस्टर करा

तुमच्याकडे असलेल्या त्या नोटचा एक फोटो काढून वेबसाईटवर अपलोड करा

तुम्ही दिलेली जाहिरात अशा लोकांना दिसेल जे जुन्या नोटा खरेदी करण्यास इच्छूक आहेत.

जर तुमच्याकडे असलेल्या जुन्या नोटवरील सीरिअल क्रमांकात 786 क्रमांक आहे तर तुम्ही ही नोट वेबसाईटवर विक्री करुन पैसे कमावू शकता. याच्या माध्यमातून तुम्हाला 3 लाख रुपये ते 4 लाख रुपये मिळू शकतात. 786 या नंबरची मागणी खूपच असते कारण अनेकजण या क्रमांकाला शुभ मानतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी